नवी मुंबईत पोलिसांसाठी विशेष कोविड रुग्णालय

महाराष्ट्र पोलिस दलातील १९१ अधिकारी व १२०५ पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर उर्वरित पोलिसांमध्ये कोरोनाचे अतिसौम्य लक्षणे आढळून आली आहेत.

नवी मुंबईत पोलिसांसाठी विशेष कोविड रुग्णालय
SHARES

देशात सध्या कोरोना (Coronavirus)  या महामारीने हाहाकार माजवला आहे. या महामारीत ही नागरिकांच्या रक्षणासाठी नेहमी प्रमाणे पोलिस सदैव तत्पर आहेत. मात्र या महामारीने त्यांना ही सोडलेलं नाही. आज राज्यात १३९६पोलिस या महामारीने त्रस्त आहेत. शहरातील सर्वच रुग्णालयांच्या खाटा आता भरल्याने पोलिसांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा पातळीवर पोलिसांसाठी विशेष रुग्णालय सुरू करण्यात आली आहे. बुधवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नवी मुंबई पोलिसांसाठी सुरू करण्यात आलेल्या या विशेष रुग्णालयाचे उद्धाटन केले.

हेही वाचाः- कोरोना रुग्णांच्या बेडसाठी वॉर्डमधील कंट्रोल रुमला करा कॉल, हे आहेत दूरध्वनी क्रमांक

महाराष्ट्र पोलिस दलातील १९१ अधिकारी व १२०५ पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर उर्वरित पोलिसांमध्ये कोरोनाचे अतिसौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्या पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून कोरोना बाधित पोलिसांच्या आकडेवारीत कमालीची वाढ होत होती. यात नवी मुंबई पोलिस दलातील पोलिसांचा ही समावेश आहे. त्यामुळेच पोलिसांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कंळबोली येथे ५०  खाटांचे विशेष कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाचे बुधवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उद्घाटन केले.

हेही वाचाः- मुंबईत 'ह्या' १८ इमारती अतिधोकादायक

सध्या कोरोना बाधित पोलिसांच्या संख्येत कमालीची घट झाली असली. तरी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले हजारो पोलिस हे सध्या क्वारनंटाइन आहेत. माञ आनंदाची बाब म्हणजे मागील दोन दिवसात हाताच्या बोटावर मोजण्या इथपर्यंत संख्या वाढली आहे. तर मागील २४ तासात पोलिस खात्यात फक्त एकाच पोलिसाला कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. माञ आनंदाची बातमी म्हणजे 500 हून अधिक पोलिस कोरोनामुक्त होऊन बरे झाले आहेत. त्यातील बहुसंख्य पोलिस पुन्हा सेवेत रुजू झाले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा