Advertisement

कोरोना रुग्णांच्या बेडसाठी वॉर्डमधील कंट्रोल रुमला करा कॉल, हे आहेत दूरध्वनी क्रमांक

कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर डॅश बोर्ड तयार केला आहे.

कोरोना रुग्णांच्या बेडसाठी वॉर्डमधील कंट्रोल रुमला करा कॉल, हे आहेत दूरध्वनी क्रमांक
SHARES

कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर डॅश बोर्ड तयार केला आहे. कोरोना रुग्णांना बेड हवा असल्यास त्यांना त्या वॉर्डमधील कंट्रोल रुमला कॉल करावा लागेल. कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत याची माहिती कोरोना रुग्णांना मिळणार आहे. वॉर्डमधील रुग्णालयात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये जागा नसल्यास दुसऱ्या वॉर्डमध्ये बेड उपलब्ध असल्यास तिथे रूग्णाला हलवलं जाईल. गुरुवारपासून या सुविधेला सुरूवात झाली.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.  या पार्श्वभूमीवर मुंबईत पालिका आयुक्त चहल यांनी विभाग कार्यालयात वॉर रुम स्थापन करण्याचे आदेश दिले होते. रोज सकाळी 8 वाजता साथ नियंत्रण विभागाकडून या वॉर रूमला पॉझिटिव्ह रुग्णांची यादी ऑनलाईन दिली जाईल. ही यादी मिळताच वॉर रूममधील डॉक्टरांकडून पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणे आहेत की नाहीत, याची माहिती घेऊन ते ज्या विभागात राहतात त्याची माहिती घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करावे की घरातच क्वारंटाईन करावे यावर निर्णय घेतला जाणार आहे.


विभाग कार्यालयातील डिजास्टर कंट्रोल रूम वॉर्ड वार रूम म्हणून जाहीर करण्यात आला आहे. विभाग कार्यालयात असलेल्या डिजास्टर कंट्रोल रूममध्ये  फोनच्या 30 लाईन असणार आहेत. एखाद्या वार्डात बेड कमी पडले तर त्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे दुसऱ्या वार्डातील बेडची संख्या समजण्यास या डॅश बोर्डमुळे फायदा होणार आहे. ज्या ठिकाणी बेड खाली असेल त्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णाला हलविण्यात येईल.



हेही वाचा -

मुंबईत ७९८ कंटेन्मेंट झोन, 'ही' आहे कंटेन्मेंट झोनची यादी

'असे' आहेत मिरा-भाईंदरमध्ये कंटेन्मेंट झोन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा