Advertisement

मधुमेही रुग्णांसाठी कोरोना धोकादायक, अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड

१० ते ३१ मार्च दरम्यान फ्रान्समधील ५३ हॉस्पिटल्समध्ये संशोधन करण्यात आले होते.

मधुमेही रुग्णांसाठी कोरोना धोकादायक, अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड
SHARES
Advertisement

सध्या देशभरात कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. अशातच समोर आलेल्या अभ्यासानुसार कोरोनामुळे आजारी असणाऱ्या १० रुग्णांपैकी १ रुग्ण ज्याला मधूमेह देखील आहे, त्याचा हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर 7 दिवसांच्या आत मृत्यू होऊ शकतो. तर, पाच रुग्णांपैकी एकाला व्हेंटिलेटवर ठेवण्याची आवश्यकता असू शकते.

१० ते ३१ मार्च दरम्यान फ्रान्समधील ५३ हॉस्पिटल्समध्ये संशोधन करण्यात आले होते. या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १ हजार ३१७ COVID-19 पेशंट्सचा डेटा यावेळी अभ्यासण्यात आला. या संशोधनामध्ये फ्रान्समधील University of Nantes मधील संशोधकांचा समावेश होता.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांमध्ये टाइप-२ मधुमेह आहे. तर 3 टक्के रुग्णांना टाइप-१ मधुमहे. तर उर्वरित रुग्णांमध्ये इतर काही प्रकारचा मधुमेह आहे.

Diabetologia या जरनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या रिसर्चनुसार, अभ्यास करण्यात आलेल्या रुग्णालयातील दोन तृतीयांश कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे पुरूष आहेत. या पुरुषांचे सरासरी वय ७० वर्षे इतके आहे. यामध्ये संशोधकांनी असं नमूद केलं आहे की, रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य नसल्यास त्याचा फारसा परिणाम होत नाही. मात्र या परिस्थितीत मधुमेह आणि जास्त वय असणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका वाढला आहे. ४७ टक्के रुग्णांमध्ये डोळे, मूत्रपिंड आणि मज्जातंतू यामध्ये काहीशी क्लिष्टता आढळून आली. तर ४१ टक्के रुग्णांच्या हृदय, मेंदू आणि पायमधील रक्तवाहिन्यांसंबधी समस्या आढळून आली.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार अभ्यास केलेल्या ५ रुग्णांपैकी एकाला सातव्या दिवशी अतिदक्षता घेण्यासाठी व्हेंटिलेटवर ठेवण्याची आवश्यकता भासली. त्यांनी अस देखील सांगितल आहे की, आतापर्यंत १० पैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी १८ टक्के रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संशोधकांच्या मते मायक्रोव्हॅस्क्यूलर कॉम्प्लिकेशन्समुळे सातव्या दिवसापर्यंत मृत्यू होण्याची जोखीम दुप्पट झाली आहे.

त्याचप्रमाणे या संशोधनानुसार ५५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या रुग्णांच्या गटापेक्षा ७५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता १४ पट जास्त आहे.
संबंधित विषय
Advertisement