Advertisement

मोटरमनच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यास परवानगी नव्हती

सीएसएमटी येथील मोटरमन, लोकल व्यवस्थापक दालनाबाहेर गुरुवारी झालेल्या आंदोलनाबाबत अहवाल तयार केला आहे.

मोटरमनच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यास परवानगी नव्हती
SHARES

गुरुवारी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने सीएसएमटी येथे आंदोलन करून लाखो प्रवाशांना वेठीस धरले. प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तसेच आंदोलनानंतर रेल्वे रूळावरून चालत जाणाऱ्या पाच प्रवाशांना लोकलने धडक दिली.

मुळात सीएसएमटी येथील मोटरमन, लोकल व्यवस्थापकाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यास परवानगी नव्हती, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी याबाबतचा संपूर्ण अहवाल तयार केला आहे. तो शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला.

ठाणे रेल्वे पोलिसांनी मुंब्रा दुर्घटनेत अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने आरोपी केल्याने सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने तीव्र निषेध व्यक्त केला.

अनुसीएसएमटी येथील मोटरमन, लोकल व्यवस्थापक दालनाबाहेर गुरुवारी झालेल्या आंदोलनाबाबत अहवाल तयार केला आहे. हा अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात केला आहे. त्यानंतर त्यांच्या आदेशाने पुढील कार्यवाही करण्यात येईल.

चित कृतीमुळे केवळ अभियांत्रिकी विभागातीलच नव्हे तर सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पक्षपाती कृत्याचा निषेध करण्यासाठी संघटनेने गुरुवारी सीएसएमटी येथील डीआरएम कार्यालयासमोर मोर्चा काढण्याचे निश्चित केले.

तसेच हा मोर्चा फलाट क्रमांक 7 आणि 8 वरून सुरू होईल. त्याचे रुपांतर एका मोठ्या बैठकीत होईल, असे पत्र या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी (पीसीपीओ) यांना दिले.

परंतु, संघटनेला मोटरमन, लोकल व्यवस्थापकांचे दालन रोखून आंदोलन करण्याची कोणतीही परवानगी नव्हती, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.



हेही वाचा

लवकरच चेंबूर ते ठाणे सिग्नल-फ्री प्रवास

गोराई, दहिसर येथे ट्विन मॅन्ग्रोव्ह पार्क

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा