Advertisement

मुंबईत कोरोनाचे ९१७ नवे रुग्ण, ४८ जणांचा दिवसभरात मृत्यू

मंगळवारी दिवसभरात ११५४ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९९ हजार १४७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ९१७ नवे रुग्ण, ४८ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात मंगळवारी कोरोने २५६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ९१७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-‘या’ गुन्ह्यात रॅपर बादशाहची पोलिसांनी केली ४ तास चौकशी

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४८ रुग्ण दगावले आहेत. तर १० आँगस्ट रोजी ४६ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ९ आँगस्ट रोजी एकूण ४८ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ९१७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख २५ हजार २१९ इतकी झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात ११५४ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९९ हजार १४७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी जाणार...

राज्यात आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा