Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी १८९ नवीन कोरोना रुग्ण

बुधवारी १४५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १६४७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी १८९ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (१२ ऑगस्ट) १८९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ८ मृत्यूंची नोंद झाली असून त्यापैकी ७ मृत्यू यापूर्वीच झाले आहेत. या ७ रूग्णांच्या मृत्यूचा अहवाल आज मिळाल्याने आज नोंद केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. मृतांमध्ये नवीन पनवेलमधील ३, कळंबोतील २, पनवेल, खांदा कॉलनी, खारघर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

 बुधवारी १४५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.  पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील २५, कामोठ्यातील ५४, खांदा कॉलनीतील २१, खारघरमधील ३१, पनवेलमधील १९, नवीन पनवेलमधील २७, तळोजा येथील ११ रुग्णाचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ८६१६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ६७६४ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २०५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १६४७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा- 

Raj Thackeray: लॉकडाऊन हवं का नको? मनसेनं सुरू केलं सर्वेक्षण IPL मध्ये

खेळण्याची संधी हुकल्याने मालाडमध्ये क्रिकेटरची आत्महत्या 
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement