COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

IPL मध्ये खेळण्याची संधी हुकल्याने मालाडमध्ये क्रिकेटरची आत्महत्या

मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढला आणि आयपीएलचे सामाने भारतात होण्याऐवजी दुबईत खेळवण्यावर शिक्का मोर्तब झाला. ही संधी हुकल्याने करण मानसिक तणावात होता.

IPL मध्ये खेळण्याची संधी हुकल्याने मालाडमध्ये क्रिकेटरची आत्महत्या
SHARES

क्रिकेटमध्ये करिअर करता न आल्याने नैराक्षेतून मालाडमधील एका क्रिकेटरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. करण तिवारी असे या क्रिकेटरचे नाव असून या प्रकरणी कुरार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. त्याच्यामृतदेहाजवळ पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मात्र क्रिकेटमध्ये संधी मिळत नसल्यामुळे तो मागील अनेक दिवसांपासून नैराक्षेत होता असे त्याच्या जवळच्यांचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचाः-मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेलं पाकिट तब्बल १४ वर्षांनी सापडलं

मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी मागील अनेक वर्षांपासून करण प्रयत्न करत होता. त्यासाठी  त्याने खूप मेहनत घेतली होती. मात्र मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढला आणि आयपीएलचे सामाने भारता ऐवजी दुबईत खेळवण्यावर शिक्का मोर्तब झाला. ही संधी हुकल्याने करण मानसिक तणावात होता. नैराक्षेत असताना त्याने शेवटचा फोन हा राजस्थानमधील त्याच्या मित्राला केला होता. त्यावेळी आपण नैराक्षेतून आत्महत्या करण्याचा मार्ग निवडल्याची माहिती त्याने त्याला दिली. त्यावेळी राजस्थान मधील मित्राने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र करण त्याच्या निर्णयावर ठाम होता. करणच्या फोनची माहिती त्याच्या मित्राने त्याची राजस्थानमधल्या बहिणीला दिली. हे कळताच करणच्या बहिणीने सबंध प्रकार आईला सांगितला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

हेही वाचाः- Mumbai Rains : मुंबईत बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज, तर 'या' जिल्ह्यांना इशारा


रात्रीच्या जेवणानंतर करण तिवारी साडेदहाच्या सुमारास त्याच्या खोलीत गेला आणि दरवाजा बंद करुन घेतला. त्याच वेळी बहिणीने फोन केल्यानंतर आईने त्याच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. करण दरवाजा उघड नाही म्हणून लॉक तोडण्यात आलं. त्यावेळी करणचा मृतदेह समोर दिसला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कुरार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी करणचा मृतदेह शववित्छेदनासाठी शासकिय रुग्णालयात पाठवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा