Advertisement

आयपीएलच्या तारखांची घोषणा, 'या' तारखेला होणार पहिला सामना

बहुप्रतिक्षेत असलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या तारखांची अधिकृत घोषणा आता करण्यात आली आहे. यंदाची आयपीएल युएईमध्ये होणार आहे.

आयपीएलच्या तारखांची घोषणा, 'या' तारखेला होणार पहिला सामना
SHARES

क्रिकेटप्रेमींसाठी आता आनंदाची बातमी आहे.  बहुप्रतिक्षेत असलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या तारखांची अधिकृत घोषणा आता करण्यात आली आहे. यंदाची आयपीएल युएईमध्ये होणार आहे.  आयपीएलचा पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी  तर फायनल मॅच ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी
या तारखा जाहीर केल्या आहेत. 

युएईमधील शारजा , दुबई आणि अबुधाबी या तीन ठिकाणी आयपीएलचे सामने होणार आहेत. यावर्षी आयपीएलचा हंगाम ५१ दिवस चालेल. आयसीसीने ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होणारी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित केल्यामुळे आयपीएलच्या आयोजनाला वेग आला होता.  

बीसीसीआयकडून आयपीएलमधील संघांसोबत बोलणी सुरू आहेत. यंदा आयपीएल २० मार्चला सुरू होणार होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित केली. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली होती. यंदाची आयपीएल रद्द करावी लागेल असं वाटत होतं. मात्र, आशिया कप स्पर्धा आणि  टी २० वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित झाल्यामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा झाला.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा