Advertisement

युएईमध्ये होणार आयपीएलचा 13वा हंगामा

आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी एका मुलाखतीत बोलताना याबद्दल माहिती दिली.

युएईमध्ये होणार आयपीएलचा 13वा हंगामा
SHARES

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १३वा हंगाम युएईमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी एका मुलाखतीत बोलताना याबद्दल माहिती दिली. त्यामुळं मागील ३ महिन्यांपासून आयपीएल होणार की नाही असा प्रश्न उपस्थित झालेल्या क्रिकेट प्रेमींच्या मनात उत्साहाच वातावरण निर्माण झालं आहे.

गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल असं पटेल म्हटलं. स्पर्धेच्या तारखांबद्दल अद्याप कोणतीही माहिती पटेल यांनी दिलेली नाही. मात्र, प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार २६ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर या काळात बीसीसीआय तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे.

'आयसीसी T-20 विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकललं जाईल याची वाट आम्ही पाहत होतो. आयसीसीनं याबद्दलची घोषणा केल्यानंतर आम्ही भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. आम्हाला परवानगी मिळेल अशी आशा आहे', अशी माहिती पटेल यांनी दिली. दुबई, अबुधाबी आणि शारजाह या ३ मैदानांवर ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेला चाहत्यांना परवानगी बद्दलचा निर्णय UAE मधील सरकारचा असल्याचं पटेल स्पष्ट केलं.

आयपीएल स्पर्धा आटोपल्यानंतर भारतीय खेळाडू तिकडून ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. त्यांना पुढील दौऱ्यासाठी पुरेसा वेळ मिळावा व इतर आवश्यक नियमांचं पालन व्हावं यासाठी ७ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार असल्याचं समजतं. सोमवारी संध्याकाळी आयसीसीनं T-20 विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलल्याची अधिकृत घोषणा केली.

ठरलेल्या वेळापत्रकानुसार २९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र देशातली करोनाची परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. यानंतरही परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळं अखेरीस ही स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली. पण स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार होतं. ते टाळण्यासाठी वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता यावं यासाठी बीसीसीआय मोर्चेबांधणी करत होतं.



हेही वाचा -

नालासोपारा स्थानकात संतप्त प्रवाशांकडून आंदोलन

गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची प्रवाशी संघटनांची मागणी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा