Advertisement

नालासोपारा स्थानकात संतप्त प्रवाशांकडून आंदोलन

अनेक प्रवासी रुळावर उतरले होते. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.

नालासोपारा स्थानकात संतप्त प्रवाशांकडून आंदोलन
SHARES

मागील ३ महिन्यांपासून बंद असलेली लोकल सेवा जून महिन्यात पुन्हा सुरू झाली. मात्र नव्या नियमांनुसार सुरू झालेल्या लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला. अनेक चाकरमान्यांनी रेल्वेच्या कारभारावर टीका केली. अशातच सर्व सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सुरु नसल्याने अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असणाऱ्या लोकलमध्ये प्रवेश देण्यात यावा किंवा प्रवाशांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी करत नालासोपारा येथे संतप्त प्रवाशांनी लोकल रोखून धरली.

बुधवारी सकाळ ८ वाजताच्या सुमारास अनेक प्रवाशांनी नालासोपारा स्थानकातील रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केलं. संतप्त प्रवाशांनी लोकल रोखून धरली. अनेक प्रवासी रुळावर उतरले होते. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.

सकाळी अनेक प्रवासी स्थानकात जमा झाले होते. मात्र, त्यांना रेल्वेत घेण्यात आले नाही. त्यामुळे हे प्रवासी संतप्त झालेत. त्यांनी लोकल प्रवास करू द्यावा या मागणीसाठी रुळावर उतरुन केले आंदोलन. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी लोकल सेवा सुरु आहे. आमच्यासाठीही लोकल सेवा सुरु करा, अशी मागणी यावेळी प्रवाशांनी केली.



हेही वाचा - 

मुंबई कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण, दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा