‘या’ देशाची भारतातील ६० बँक खाती ईडीने गोठवली

काही व्यायवसायिकांनी मिळून त्या देशाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे. त्या अनुषंगाने ही कारवाई केल्याचे समजते

‘या’ देशाची भारतातील ६० बँक खाती ईडीने गोठवली
SHARES

भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांचे चांगले संबध आहे. कोरोना महामारी (Coronavirus pandemic)च्या काळात ही भारताने तब्बल १५०हून अधिक देशांना औषध आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. मात्र या काळातच ब्राझील सारखा देश आर्थिक घोटाळ्याने हादरल्याने त्यांनी भारताला देशातील बँकेत असलेली ६० खाती गोठवण्याची विनंती केली होती. त्यानुसार भारताच्या ईडी (Enforcement Directorate )ने ती खाती गोठवली आहेत.

हेही वाचाः- नालासोपारा स्थानकात संतप्त प्रवाशांकडून आंदोलन

ब्राझीलमध्ये काही व्यायवसायिकांनी मिळून त्यांच्या देशाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे. या व्यावसायिकांविरोधात ब्राझीलने कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली. त्या व्यावसायिकांची माहिती गोळा करताना. काही व्यावसायिकांची खाती ही भारतात असल्याचे ब्राझील प्रशासनाला निदर्शनास आले. त्यानुसार ब्राझीलने भारताला त्याच्या देशातील ६० खाती ही गोठवण्याची विनंती केली होती. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये आर्थिक गुन्ह्यांचा सामना करण्याच्या हेतून काही वर्षांपूर्वी परस्पर करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने भारताना ब्राझीलच्या सांगण्यावरून त्यांच्या देशाची संबधित भारतात असलेली  ६० खाती ही एजन्सी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अँक्ट(Money Laundering A) अंतर्गत ईडीने गोठवली आहेत.

हेही वाचाः- मुंबई कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण, दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा