Advertisement

मुंबई कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण, दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू

तर मंगळवारी दिवसभरात ९०५ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७३ हजार ५५५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबई कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण, दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी कोरोनाच्या रुग्णांनी १ लाखांचा टप्पा ओलांडल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झालेली. राज्यात आज कोरोनाने २४६ जणांचा बळी घेतला. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण  (Control over the coronaviris ) मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ९९५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत (Coronavirus pandemic)रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-जी.व्हि.के ग्रुपचे चेअरमन जी वेंकट कृष्णा रेड्डी यांच्या अडचणीत वाढ,  सीबीआयने फास आवळला

 मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर (Corona death stats ) दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६२ रुग्ण दगावले आहेत. तर १९ जुलै रोजी ६४ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २० जुलै रोजी एकूण ४१ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ९९५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ३२६२ इतकी झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात ९०५ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७३ हजार ५५५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- लाॅकडाऊनचे उल्लंघन, पोलिसांनी केल्या ९२ हजार गाड्या जप्त

राज्यात आज ७१८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.७२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ८२ हजार २१७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३६९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३२ हजार २३६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी आज दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ४० हजार ६४४ नमुन्यांपैकी ३ लाख २७ हजार ०३१ नमुने कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus positive) (१९.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ७९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईन( Home quarantine ) मध्ये आहेत. सध्या ४५ हजार ७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २४६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७५ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २४६ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-३, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-६, कल्याण-डोंबिवली मनपा-३, उल्हासनगर मनपा-५ भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-४, रायगड-४,पनवेल-२, नाशिक-२, नाशिक मनपा-४, मालेगाव मनपा-१, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, धुळे-१,  जळगाव-४, जळगाव मनपा-२, नंदूरबार-२, पुणे-१, पुणे मनपा-४०, पिंपरी-चिंचवड मनपा-१५,सोलापूर-६, सोलापूर मनपा-४, सातारा-८, कोल्हापूर-१, कोल्हापूर मनपा-२, सांगली-२, औरंगाबाद-५, औरंगाबाद मनपा-१२, जालना-१, परभणी-२, परभणी मनपा-१, लातूर-३, लातूर मनपा-३, उस्मानाबाद-३, नांदेड-२, अकोला-१, अमरावती-१, यवतमाळ-३, वाशिम-२, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य ३ अशी नोंद आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा