Advertisement

Mission Zero: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'मिशन झिरो' मोहीम


Mission Zero: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'मिशन झिरो' मोहीम
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेनं 'मिशन झिरो' मोहीम हाती घेतली आहे. या मोहिम अंतर्गत वरळी, अ‍ॅन्टॉप हिल, डोंगरी, वडाळा, चर्नी रोड, गिरगाव, फोर्ट, कुलाबा, दादरमधील रुग्णांच्या शोधार्थ मोबाइल क्लिनिक व्हॅनद्वारे ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचं उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आलं. कोरोना रुग्णांची संख्या शून्य करण्याच्या दृष्टीनं मुंबई महापालिका, भारतीय जैन संघटना, क्रेडाई – एमसीएचआय आणि देश अपनाये यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन झिरो’ मोहीम राबविण्यात येत आहे. 

मुंबईमधील काही भागात रुग्ण दुपटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असून, या विभागांमध्ये शीघ्र कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शून्य करोना रुग्ण लक्ष्यांक गाठण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत ७ मोबाइल क्लिनिक व्हॅनद्वारे ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम दक्षिण मुंबईत राबविण्यात येत आहे.

आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते गुरुवारी हरी बाग, मगन बाग कंपाऊंड, जैन मंदिराजवळ, सीताराम जाधव मार्ग, लोअर परळ (पश्चिम) इथं करण्यात आलं. तसंच, यावेळी शिवसेना नगरसेवक आशीष चेंबूरकर, क्रेडाई—एमसीएचआयचे माजी अध्यक्ष धर्मेश जैन, भारतीय जैन संघटनेचे (बी.जे.एस.) दक्षिण मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. हसमुख भाई शहा, कुवर छेडा, जितेंद्र खिराणी आदी उपस्थित होते.

‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत ७ मोबाइल क्लिनिक व्हॅन दक्षिण मुंबईमधील वरळी, अ‍ॅन्टॉप हिल, डोंगरी, वडाळा, चर्नी रोड, गिरगाव, फोर्ट, कुलाबा, दादर या भागात धावणार आहेत. करोनाचे रुग्ण आढळणाऱ्या भागात जाऊन या क्लिनिक व्हॅनमधील डॉक्टर संशयित रुग्णांची तपासणी करणार आहेत. तपासणीदरम्यान करोनाबाधित संशयित आढळल्यास डॉक्टर तत्काळ त्याची स्वाब चाचणी करणार आहेत



हेही वाच -

Salons Open: २८ जूनपासून सलून सुरू, फक्त केसच कापणार

सामान्य प्रवाशांसाठी लोकल १२ ऑगस्टपर्यंत बंद; लांब पल्ल्यांच्या नियमित गाड्याही रद्द



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा