Advertisement

coronavirus update: राज्यातील ५ हजार जण हायरिस्क काॅन्टॅक्टमध्ये, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची धक्कादायक माहिती

राज्यातील ५ हजार जणांहून अधिक जण कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संपर्कात आल्याने हायरिस्क काॅन्टॅक्टमध्ये (high risk contact with coronavirus) आले आहेत.

coronavirus update: राज्यातील ५ हजार जण हायरिस्क काॅन्टॅक्टमध्ये, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची धक्कादायक माहिती
SHARES

राज्यातील ५ हजार जणांहून अधिक जण कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संपर्कात आल्याने हायरिस्क काॅन्टॅक्टमध्ये (high risk contact with coronavirus) आले आहेत. ही अतिशय चिंताजनक बाब असून या सगळ्यांचं विलगीकरण (quarintine) करून त्यांची चाचणी करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला (bmc war room) भेट दिल्यानंतर राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा- नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा जनतेला इशारा

रुग्णांची संख्या ३२० वर

कोरोना व्हायरसच्या (covid-19) रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत दिवसागणिक भर पडत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३२० वर पोहोचला आहे. तर, आतापर्यंत १२ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ३२० पैकी ३९ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात सर्वाधिक १६२ रुग्ण मुंबईतील असून त्याखालोखाल पुण्यात ३८ आणि सांगलीत २५ रुग्ण आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवड, नागपूर, बुलडाणा अशा विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जवळचा संपर्क

महापालिकेच्या वाॅर रुमला (bmc war room) भेट दिल्यानंतर झालेल्या बैठकीत राजेश टोपे म्हणाले की, सर्व प्रकारची खबरदारी घेऊनही साथ वाढत असल्यानं प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने ५ हजारांहून अधिकजण हायरिस्कमध्ये आले आहेत. ही संख्या आता ५३४३ इतकी आहे. या सर्वांच विलगीकर करून त्यांची चाचणी केली जाणार आहे. या सगळ्यांवर ४ हजार जण लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा- कोरोना संशयितांचे नमुने घेऊ नका, किटच्या कमतरतेमुळे खासगी प्रयोगशाळांना निर्देश

मुंबईतही वाढती चिंता

मुंबईतील वाढता आकडा देखील चिंतेची बाब आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ वर गेली आहे. राज्यात आता संशयितांची चाचणी वेगाने करण्याचं आव्हान रुग्णालयांसमोर आहे. मुंबईत ५ सरकारी आणि ७ खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना संशयितांची चाचणी केली जात आहे. एका दिवसाला २ हजार चाचण्यांची क्षमता सध्या मुंबईत आहे. याशिवाय अतिरिक्त मास्क आणि व्हेंटिलेटर्सचीही तयारी केली जात असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. पुढे हे आव्हान कसं पेलायचं यासंबंदी बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा