Advertisement

'या' वयोगटातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक

मुंबईत प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

'या' वयोगटातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असून मृत्यूचं प्रमाणही अधिक आहे. मुंबईत एकूण ५ हजार ८१४ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ६० ते ७० वयोगटातील १ हजार ७०८ मृतांचा समावेश आहे. मुंबईतील मृतांपैकी २९.३७ टक्के मृत्यू हे ६० ते ७० वयोगटातील असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुंबईत प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आतापर्यंत ५ हजार ८१४ व्यक्तिंचा मृत्यू झाला असून त्यात ५० ते ६० वयोगटातील १ हजार ५५४ मृतांचा समावेश आहे. मुंबईतील ५० ते ६० वयोगटातील मृत्यूचं प्रमाण २६. ७२ टक्के आहे. १० वर्षाखालील १० मुलांचा आणि १०० ते ११० वर्षादरम्यानच्या एका व्यक्तीचाही करोनाने मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांची इम्युनिटी पॉवर कमी असून त्यांना अन्य आजार असतात. बहुतेक रुग्णांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा आणि अन्य आजार असल्याने त्यांचा कोरोनाने मृत्यू होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मुंबईत ७० ते ८० वयोगटातील १ हजार ३७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ८० ते ९० वयोगटातील ४३४ लोकांनाही आपला प्राण गमवावा लागला आहे. ९० ते १०० वयोगटातील ४२ रुग्णांचाही मृत्यू झाला आहे.

तरुण आणि वय कमी असलेल्यांना करोनावर मात करता आली आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंत ४० ते ५० वयोगटातील ६९४, ३० ते ४० वयोगटातील २५७, २० ते ३० वयोगटातील ९० आणि १० ते २० वयोगटातील २१ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.



हेही वाचा -

नालासोपारा स्थानकात संतप्त प्रवाशांकडून आंदोलन

गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची प्रवाशी संघटनांची मागणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा