सुशांत आत्महत्या प्रकरणात संजय राऊत अडचणीत

या प्रकरणाशी संबधित अनेक दावे राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून केले. त्यामुळेच राऊत यांच्या विरोधात आता अब्रुनुकसानीचा दावा ठोकला जाणार असल्याचे कळते.

सुशांत आत्महत्या प्रकरणात संजय राऊत अडचणीत
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आरोप प्रत्यारोपावरून अनेक जण अडचणीत आले. त्या यादीत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नावाही समावेश झाला आहे. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत आणि  त्याचे वडिल केके सिंह यांच्यात संबध दुरावल्याचे म्हटले होते. तर या प्रकरणाशी संबधित अनेक दावे राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून केले. त्यामुळेच राऊत यांच्या विरोधात आता अब्रुनुकसानीचा दावा ठोकला जाणार असल्याचे कळते.

हेही वाचाः- गणपतीला गावी जाणाऱ्यांसाठी खूश खबर...

शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'सामना'तील 'रोखठोक' या सदरातून ‘सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांत हा गेल्या काही वर्षांत संपूर्ण मुंबईकर बनला. त्याचा बिहारशी संबंध नव्हता. सुशांतला सर्व वैभव मुंबईनेच दिले. त्याच्या संघर्षाच्या काळात बिहार पाठीशी नव्हता. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही.’ असे दावे करण्यात आले.

हेही वाचाः- ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

मात्र हेच दावे आणि राऊत यांच्या अडचणीत वाढ करणार असल्याचे दिसते, सुशांत सिंह राजपूतचा चुलत भाऊ आमदार नीरज सिंह बबलू याने राऊत यांच्या या दाव्यावरून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते. सुशांत वडिलांवर नाराज होता, त्याचे घरातल्यांशी पटत नव्हते. हे सर्व दावे निराधार आहे. जाणून बुजून त्याला राजकिय वळण दिले जात असल्याचे नीरज यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. राऊत यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकल्या जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय