Advertisement

आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल- संजय राऊत

हे कारस्थान महाराष्ट्राविरोधात केलं जात आहे. हे कारस्थान रचणाऱ्या सूत्रधाराला मोठी किंमत मोजावी लागेल असा जाहीर इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल- संजय राऊत
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून जे कारस्थान रचलं जातंय ते केवळ एका युवा मंत्र्याविरुद्ध नाही किंवा ठाकरे कुटुंबाविरोधात नाही तर हे कारस्थान महाराष्ट्राविरोधात केलं जात आहे. हे कारस्थान रचणाऱ्या सूत्रधाराला मोठी किंमत मोजावी लागेल असा जाहीर इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. (shiv sena mp sanjay raut slams allegations on aaditya thackeray over sushant singh rajput case)

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा आपला काडीमात्रही संबंध नसल्याचा खुलासा नुकताच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला होता. तरीही आरोप-प्रत्यारोपाचं सत्र न थांबल्याने आदित्य ठाकरेंविरोधात राजकारण करणाऱ्यांना राऊत यांनी इशारा दिला आहे.

काय म्हणाले राऊत?

महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्याने विरोधी पक्षातील काही लोकांच्या पोटात दुखत असून ते अस्वस्थ झाले आहेत. ज्यांना हे सरकार रुचलेलं नाही, सरकार अस्थिर करता आलं नाही ते वैफल्यातून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप करत आहेत.

हेही वाचा - मी बाळासाहेबांचा नातू! सुशांत सिंह प्रकरावरून आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन

दळभद्री राजकारण

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात दळभद्री राजकारण सुरू आहे. आदित्य ठाकरे यांचा या सगळ्याशी काय संबंध? असा प्रश्न विचारतानाच आदित्य ठाकरेंना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. ठाकरे कुटुंबातील ते एक महत्त्वाचा घटक आहेत. ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला तडा जाईल, असं कोणतंही कृत्य त्यांच्याकडून होणार नाही, असं त्यांनीही स्पष्ट केलं असून त्यावर आमचा विश्वास आहे. ज्यांना कारस्थान करायचंय ते करूद्यात, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

किंमत मोजावी लागेल

हे कारस्थान फक्त एका युवा मंत्र्याविरुद्ध नाही किंवा ठाकरे कुटुंबाविरोधात नाही. मला तर हे संपूर्ण महाराष्ट्राविरोधात कारस्थान असल्याची शंका आहे. यामागील सूत्रधार आम्हाला ठाऊक आहे. त्या सगळ्यांना या कारस्थानाची मोठी किंमत मोजावी लागेल असं मी जाहीरपणे सांगतो, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

घाणेरडं राजकारण

दरम्या, कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा परभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुदा महाराष्ट्र सरकारचं यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं घाणेरडं राजकारण सुरू केलं आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसंच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून आरोप करणाऱ्यांना सुनावलं आहे.

हेही वाचा - तर फडणवीसांनी खुशाल राज्य सोडून जावं, अनिल परब संतापले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement