Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,72,781
Recovered:
57,19,457
Deaths:
1,17,961
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,809
733
Maharashtra
1,32,241
9,361

तर फडणवीसांनी खुशाल राज्य सोडून जावं, अनिल परब संतापले

अमृता फडणवीस यांना एवढंच असुरक्षित वाटत असेल, तर त्यांनी खुशाल राज्य सोडून जावं, असा टोला शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी लगावला आहे.

तर फडणवीसांनी खुशाल राज्य सोडून जावं, अनिल परब संतापले
SHARES

अमृता फडणवीस यांना मुंबईत एकाएकी कसं काय असुरक्षित वाटू लागलं आहे? हे निव्वळ राजकारण असून खुर्ची गेल्याची तडफड यातून दिसत आहे. अमृता फडणवीस यांना एवढंच असुरक्षित वाटत असेल, तर त्यांनी खुशाल राज्य सोडून जावं, असा टोला शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी लगावला आहे. (shiv sena mla anil parab slams amruta fadnavis over sushant singh rajput suicide case investigation from mumbai police)

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी लोकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित राहिलेलं नाही, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. शिवाय आपल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले होते. 

हेही वाचा - आता मुंबईत राहणं सुरक्षित नाही, अमृता फडणवीसांचं ट्विट

त्यावर अनिल परब यांना विचारला असता, ते म्हणाले, फडणवीस सरकारच्या काळात सरकारने नेहमीच पोलिसांची स्तुती केली. पोलिसांना शाबासकी दिली. त्याच्या मागे ठामपणे उभे राहिले. फडणवीस सरकार काळात ५ वर्षे पोलीसही तेच होते. ज्या पोलिसांच्या सुरक्षेत गेली ५ वर्षे अमृता फडणवीस होत्या आणि आजही आहेत, तेच पोलीस त्यांना सुरक्षा देत आहेत. सरकार बदललं म्हणून पोलीस बदलत नाहीत. पोलिसांवरच त्यांचा अविश्वास असेल तर त्यांनी खुशाल हे राज्य सोडून जावं, असा सल्ला अनिल परब यांनी दिला.

केवळ खुर्ची गेली म्हणून त्यांना असुरक्षित वाटू लागलेलंं आहे. यात दुसरं तिसरं काहीही नसून केवळ राजकारण आहे. खुर्ची गेल्याची तडफड यातून दिसत आहे. मुंबईतील कुठल्या नागरिकानं असुरक्षित वाटत असल्याची तक्रार केली आहे? अमृता फडणवीसांना मुंबईत असुरक्षित वाटण्यासारखं असं काय घडलंय?, असा प्रश्न उपस्थित करताना मुंबई पोलीस सुशांतसिंह राजपूत याचं प्रकरण व्यवस्थित हाताळत असल्याचा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला.

मागील काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलीस आणि गृह मंत्रालयाला विरोधकांकडून लक्ष्य केलं जात आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेत सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी देखील सातत्याने केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला बिहार पोलीस आणि अंमलबजावणी संचलनालयाने देखील या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा - मी बाळासाहेबांचा नातू! सुशांत सिंह प्रकरावरून आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा