Advertisement

आता मुंबईत राहणं सुरक्षित नाही, अमृता फडणवीसांचं ट्विट

मुंबईने माणुसकी गमावली आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांना लक्ष्य केलं आहे.

आता मुंबईत राहणं सुरक्षित नाही, अमृता फडणवीसांचं ट्विट
SHARES

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांना लक्ष्य केलं आहे. (amruta fadnavis questioned mumbai police over actor sushant singh rajput suicide case investigation)

मागील काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलीस आणि गृह मंत्रालयाला विरोधकांकडून लक्ष्य केलं जात आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेत सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी देखील सातत्याने केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला बिहार पोलीस आणि अंमलबजावणी संचलनालयाने देखील या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे. त्यातच अमृता फडणवीस यांनी ट्विट करत पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

आपल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे की, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी लोकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित राहिलेलं नाही. शिवाय आपल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहेत.

हेही वाचा - सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने-अनिल देशमुख

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास योग्य दिशेने आणि  योग्य पद्धतीने सुरु असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एएनआयशी संवाद साधताना दिली.

सुशांत मृत्यू प्रकरणात आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून पोलिसांचा तपास सुरू आहे. सुशांतचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, यावर तपास सुरू असला, तरी सुशांत बायपोलर डिसआॅर्डर या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत. सुशांतच्या खात्यातून रियाच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर झाले की नाही याबाबत अजून तपास सुरू आहे. या प्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची दोनदा चौकशी झाल्याची माहिती देखील मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा