Advertisement

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने-अनिल देशमुख

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने सुरु असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एएनआयशी संवाद साधताना दिली.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने-अनिल देशमुख
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास योग्य दिशेने आणि  योग्य पद्धतीने सुरु असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एएनआयशी संवाद साधताना दिली. सध्या सुशांत सिंहच्या तपासावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता, गृहमंत्र्यांनी हे उत्तर दिलं. (mumbai police investigation is progressing right direction in sushant singh rajput case says maharashtra home minister anil deshmukh)

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही? याची माहिती देण्यासाठी राज्य सरकारवर सातत्याने दबाव येत आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत याविषयीची माहिती प्रसार माध्यमांना दिली. या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात आतापर्यंत किती जणांचे आणि कोणाचे जबाब नोंदवण्यात आले, हे सांगितलं.

हेही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरण ! बिहार पोलिसांचा तपास ठप्प, ‘ते’ ४ अधिकारीही क्वारंटाईन

सुशांत मृत्यू प्रकरणात आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून पोलिसांचा तपास सुरू आहे. सुशांतचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, यावर तपास सुरू असला, तरी सुशांत बायपोलर डिसआॅर्डर या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत. सुशांतच्या खात्यातून रियाच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर झाले की नाही याबाबत अजून तपास सुरू आहे. या प्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची दोनदा चौकशी झाल्याची माहिती देखील परम बीर सिंग यांनी दिली.

दरम्यान या प्रकरणाचा बिहार पोलीस देखील समांतर तपास करत आहेत. बिहार पोलिसांनी मुंबईत येत सुशांतची मैत्रीण अंकिता लोखंडे हिची देखील चौकशी केली. तर या प्रकरणात पैशांच्या हेराफेरीची तक्रार करण्यात आल्याने अंमलबजावणी संचलनालयाने देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  

दरम्यान बिहारमधूल मुंबईत तपासासाठी आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आल्याने या विषयावर पुन्हा राजकारण रंगू लागलं आहे. बिहारमधून आलेले पोलीस अधिकारी गोरेगांव (पूर्व) येथील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) ग्रुप ८ विश्रामगृहात थांबले होते. त्याची माहिती महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभाग कार्यालयाला मिळाली. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने त्यांना कोविड १९ संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार गृह अलगीकरण (होम क्वारंटाईन) करणं आवश्यक असल्याने महानगरपालिकेच्या पथकाने त्यांना क्वारंटाईन केल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - सुशांत सिंह आत्महत्येच्या प्रकरणी ‘कूक’ने केला मोठा खुलासा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा