सुशांत सिंह आत्महत्येच्या प्रकरणी ‘कूक’ने केला मोठा खुलासा

दुसरीकडे बिहारमध्ये सुशांतच्या वडिलांनी रियावर केलेल्या आरोपाने एकच खळबळ उडाली असून त्यांच्या आरोपामुळे या संपूर्ण प्रकणाची दिशाच बदलली.

सुशांत सिंह आत्महत्येच्या प्रकरणी ‘कूक’ने केला मोठा खुलासा
SHARES

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत दररोज नव नवीन खुलासे समोर येत आहे. या आत्महत्येच्या चौकशीवरून महाराष्ट्र आणि बिहार राज्यामध्ये  जोरदार रस्सीखेच सुरू असताना. रविवारी या आहे.आत्महत्येच्या तपासासाठी बिहारचे एसपी विनय तिवारी हे मुंबईत दाखल झाले आहे. मात्र सुशांतचा जुना कूक ज्याला रिया चक्रवर्तीच्या सांगण्यावरून कामावर काढून टाकण्यात आले, त्याने मोठा खुलासा केला आहे. त्या प्रकरणी मुंबई आणि बिहार पोलिस संयुक्तरित्या या आत्महत्येचा तपास करत असल्याची माहिती बिहारचे एसपी विनय तिवारी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

हेही वाचाः- व्हॉट्सअ‍ॅपने घरबसल्या करा बँकिंग कामे, 'अशी' आहे व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सुविधा

सुशांत सिंहच्या आत्महत्येला आता कित्येक दिवस उलटले तरी त्याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळेचकी काय आता सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ४०हून अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत. मुंबई पोलिसांचा तपास सुरू असताना. दुसरीकडे बिहारमध्ये सुशांतच्या वडिलांनी रियावर केलेल्या आरोपाने एकच खळबळ उडाली असून त्यांच्या आरोपामुळे या संपूर्ण प्रकणाची दिशाच बदलली. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर केलेल्या आरोपाची शहानिशा करण्यासाठी बिहार पोलिसांनीही थेट मुंबई गाठली.

हेही वाचाः- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

 बिहार पोलिसांच्या चौकशीत सुशांत दोन सिमकार्ड वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही सिमकार्ड हे त्याच्यावर नसून ते सिद्धार्थ पीठानी याच्यानाववर होते. त्यामुळे बिहार पोलिसांनी सिद्धार्थला चौकशीसाठी समन्स केला आहे.  तर दुसरीकडे सुशांचा कुक अशोक यानेही रियाच्या सांगण्यावरून कामावरून त्याला कमी केल्याचा आरोप केला आहे. तसेच डिसेंबरमध्ये मी आणि सुशांतच्या दोनला  बहिणी त्याला भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी सुशांतला भेटण्याबाबत त्याला मेसेज केला होता. त्यावेळी त्याने मिटिंगमध्ये असल्याचे कारण सांगून भेट टाळली. छिचोरे चित्रपटानंतर सुशांतला आराम करायचा होता. त्यामुळे त्याने  दोन ते तीन मिहिने कुठलाही चित्रपट स्विकारणार नसल्याचे सांगितले होते. सुशांतला चित्रपट मिळत नव्हते किंवा बाॅलीवूडमधील काही दिग्गज त्याच्यावर दबाव टाकत असल्याचे बोलले जाते. हे पूर्णतहा चुकीचे असल्याचे अशोकने सांगितले. सप्टेंबर २०१९  पर्यंत मी त्यांच्याकडे कामाला होतो. त्या काळात ते कधीही मला तणावात दिसले नाहीत. आम्हाला हेच कळालं नाही की सुशांत तणावात का होता. अशी प्रतिक्रिया अशोकने प्रसार माध्मांना दिली आहे.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे ११०५ नवे रुग्ण, रविवारी ४९ जणांचा दिवसभरात मृत्यू

तसेच सुशांत सिंह राजपूत यांच्या घरात दीड वर्ष हाऊसकीपिंग स्टाफ आणि सुशांतचा वैयक्तिक मुलगा म्हणून काम करणारा नीरज सिंग शेवटच्या दिवसापर्यंत (१४ जून आत्महत्या) सुशांतच्या घरी कार्यरत होता. त्या दिवशी नेमकं काय झाले, याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार दरवाजा तोडल्यानंतर नीरजला सुशांतचा मृतदेह पंखावर लटकलेला दिसला. नीरज ही अशी व्यक्ती आहे जो १४ जून रोजी सकाळी सुशांतला शेवटचा भेटला. नीरजने दिलेल्या माहितीनुसार १३ जून रोजी घरात कोणतिही पार्टी झाली नाही. सुशांत आणि रिया दोघंही एकमेंकावर प्रेम करायचे. त्या दोघांमध्ये वाद झालेला मी तरी नाही पाहिला. ६ जूनला रियाने ज्या वेळी घर सोडले. त्यावेळी तिने कपड्यांनी भरलेली बॅग होती.  सुशांत रियाला विचारल्या शिवाय कुठलीही गोष्ठ करायचा नाही. तो पूर्णपणे रियावर अवलंबून होता. त्याचे आर्थिक व्यवहारही रिया संभाळायची. घरातील सर्व निर्णय हे रियाच घ्यायची. रियाच्या सांगण्यावरून काही स्टाफलाही कमी केल्याचे निरजने प्रसार माध्यमांना सांगितले आहे.  या प्रकरणात बिहार पोलिसांनी सुशांतची पूर्वीची मॅनेजर दिशा सलियन हिच्या घरालाही रविवारी भेट दिली. दिशानेही काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. या प्रकऱणी मालवणी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यासंबधितचे कागदपत्रही बिहार पोलिसांनी चौकशीसाठी मागवल्याचे कळते. बिहार पोलिसांनी दिशाच्या घरालाही भेट दिली. मात्र घरी कोणी मिळू आले नाही.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा