Advertisement

न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास, सत्य समोर येईल - रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे. रियानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास, सत्य समोर येईल - रिया चक्रवर्ती
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पाटण्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल झाली. त्यानंतर आता रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे. रियानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये रियानं आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओमध्ये ती भावूक झालेली दिसली. ती म्हणाली की, देवावर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. २० सेकंदाच्या या व्हिडिओत रियानं माध्यमांवर निशाना साधला आहे.

रिया व्हिडिओत म्हणाली की, "मला देव आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल. माध्यमांमध्ये लोक माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. मी माझ्या वकिलांमार्फत उत्तर देईल. सत्याचा विजय होईल."

हेही वाचा : सुशांतवर आधारीत चित्रपटातील विलनचा लूक समोर, नेटिझन्सनी केली करणशी तुलना

रियानं बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात तिनं म्हटलं आहे की, FIR पाटणा इथून मुंबईत ट्रान्सफर करावी. ही मागणी करत तिनं तिच्यावरील सर्व आरोपांचं खंडन देखील केलं आहे. तिचं म्हणणं आहे की, यात तिला चुकिच्या पद्धतीनं अडकवलं जात आहे. मला अडकवण्यासाठी बळाचा देखील वापर केला जात आहे.

रियानं कोर्टात याचिका दाखल केली असून त्यात असं लिहिलं आहे की, याचिकाकर्ता एक अभिनेत्री आहे आणि ती २०१२ पासून कला विश्वात आहे. विचित्र परिस्थितीत मृताचे वडील कृष्णा किशोरसिंह यांच्या चिथावणीखोरीवर हा खटला नोंदवून याचिकाकर्त्याची चुकिची बाजू मांडली आहे. रियानं आपल्या अर्जात कबूल केलं की, ती राजपूतसोबत राहत होती. सुशांतच्या मृत्यूमुळे आणि त्यानंतर येणाऱ्या बलात्काराच्या वक्तव्याचा तिला तीव्र धक्का बसला आहे.

रियाच्या मते, तिला सातत्यानं बलात्कार आणि हत्येच्या धमक्या मिळत आहेत. त्याविरोधात तिनं सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. त्यात म्हटलं आहे की, सुशांत आणि याचिकाकर्ते ८ जून २०२० पर्यंत एक वर्ष एकत्र राहत होते. त्यानंतर ती तात्पुरती मुंबईतील आपल्या निवासस्थानी गेली.हेही वाचा

रिया चक्रवर्तीचं सुशांतसिंग राजपूतच्या वडिलांना प्रत्युत्तर

सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकितानं सोडलं मौन, नैराश्यासंदर्भात केला मोठा खुलासा

संबंधित विषय
Advertisement