Advertisement

रिया चक्रवर्तीचं सुशांतसिंग राजपूतच्या वडिलांना प्रत्युत्तर

सुशांतच्या वडिलांनी पटना इथं सुशांतच्या गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

रिया चक्रवर्तीचं सुशांतसिंग राजपूतच्या वडिलांना प्रत्युत्तर
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनाला दीड महिना उलटून गेला आहे. तरीही मुंबई पोलिसांचा तपास कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेला नाही. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी पटना इथं सुशांतच्या गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता मुंबई पोलिसांसह बिहार पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. त्याचवेळी रियानं सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाचं खंडन केलं आहे.

रियानं बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात तिनं म्हटलं आहे की, FIR पाटणा इथून मुंबईत ट्रान्सफर करावी. ही मागणी करत तिनं तिच्यावरील सर्व आरोपांचं खंडन देखील केलं आहे. तिचं म्हणणं आहे की, यात तिला चुकिच्या पद्धतीनं अडकवलं जात आहे. मला अडकवण्यासाठी बळाचा देखील वापर केला जात आहे.

हेही वाचा : अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या

रियानं कोर्टात याचिका दाखल केली असून त्यात असं लिहिलं आहे की, याचिकाकर्ता एक अभिनेत्री आहे आणि ती २०१२ पासून कला विश्वात आहे. विचित्र परिस्थितीत मृताचे वडील कृष्णा किशोरसिंह यांच्या चिथावणीखोरीवर हा खटला नोंदवून याचिकाकर्त्याची चुकिची बाजू मांडली आहे. रियानं आपल्या अर्जात कबूल केलं की, ती राजपूतसोबत राहत होती. सुशांतच्या मृत्यूमुळे आणि त्यानंतर येणाऱ्या बलात्काराच्या वक्तव्याचा तिला तीव्र धक्का बसला आहे.

रियाच्या मते, तिला सातत्यानं बलात्कार आणि हत्येच्या धमक्या मिळत आहेत. त्याविरोधात तिनं सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. त्यात म्हटलं आहे की, सुशांत आणि याचिकाकर्ते ८ जून २०२० पर्यंत एक वर्ष एकत्र राहत होते. त्यानंतर ती तात्पुरती मुंबईतील आपल्या निवासस्थानी गेली.



हेही वाचा

सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकितानं सोडलं मौन, नैराश्यासंदर्भात केला मोठा खुलासा

मराठीतील पहिला झोंबिवर आधारीत चित्रपट, झोंबिवलीचा फर्स्ट लूक आला समोर

संबंधित विषय
Advertisement