Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

शाह यांनी त्यांना कोरोना झाल्याची माहीत स्वतःच ट्विटरच्या माध्यमातून दिली. शाह यांच्या ट्विटनंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्वीट करून गृहमंत्री अमित शहा यांच्या त्वरित प्रकृतीसाठी प्रार्थना केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण
SHARES

देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटात गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. स्वत: अमित शहा यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. अमित शहा यांनी ट्वीट केले की, 'कोरोनाची सुरुवातीची लक्षणे पाहून, माझी चाचणी झाली आणि अहवाल सकारात्मक आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे. गेल्या काही दिवसात माझ्याशी संपर्क साधलेले तुम्ही सर्वांनी मला विनंती आहे. की कृपया स्वतःला सेल्फ क्वारनटाईन करून घ्या. तुम्हीही टेस्ट करून घ्या. अमित शहा यांना गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, स्वतः अमित  शाह हे मैदानात उतरले. मागील काही दिवसांपासून शाह हे दिल्लीत विविध रुग्णालय आणि क्वारनटाईन सेंटरला भेट देत कोरोना संदर्भातील उपाय योजनांचा आढावा घेत होते. याच दरम्यान त्यांना कोरोना झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाह यांना रविवारी दुपारी ४ च्या सुमारास मेदांता रुग्णालयात दाखल केले. शाह यांनी त्यांना कोरोना झाल्याची माहीत स्वतःच ट्विटरच्या माध्यमातून दिली. शाह यांच्या ट्विटनंतर  भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्वीट करून गृहमंत्री अमित शहा यांच्या त्वरित प्रकृतीसाठी प्रार्थना केली. त्यांनी ट्वीट करून लिहिले की, 'माननीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना संसर्ग झाल्याची बातमी मिळाली. त्याच्या त्वरित प्रकृतीसाठी मी देवाला प्रार्थना करतो. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरच्या माध्यमातून शाह यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

हेही वाचाः- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोकसंबंधित विषय
Advertisement