Advertisement

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचं मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक
SHARES

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचं मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं आहे. शारदाताई टोपे यांच्यावर रविवारी २ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ४  वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.  जालना इथं त्यांच्या आईंवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली आखली आहे त्याचं पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.


शारदाताई टोपे हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल इथं उपचार सुरू होते. मात्र उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर ॲडमिट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे.

'ती अजातशत्रू होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. 4 वर्षांपूर्वी वडील गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील,' अशी भावना मंत्री टोपे यांनी व्यक्त केली.




संबंधित विषय
Advertisement