Coronavirus cases in Maharashtra: 230Mumbai: 92Pune: 30Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

क्लस्टर उद्घाटनाचे निमंत्रण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना नाही

शिवसेनेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आभाराचे बॅनर लावून समाजमाध्यमांवर पोस्ट टाकल्या. मात्र, आता क्लस्टर प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचेच फडणवीसांना निमंत्रण देण्यास शिवसेना का विसरली.

क्लस्टर उद्घाटनाचे निमंत्रण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना नाही
SHARE

ठाण्यातील महत्त्वपूर्ण क्लस्टर प्रकल्पा(Cluster project)ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंजुरी दिली होती. त्याबद्दल शिवसेने (Shivena)च्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आभाराचे बॅनर लावून समाजमाध्यमांवर पोस्ट टाकल्या. मात्र, आता क्लस्टर प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचेच फडणवीसांना निमंत्रण देण्यास शिवसेना का विसरली, असा सवाल भाजपाचे आमदार व ठाणे शहराध्यक्ष (Thane city chief) निरंजन डावखरे यांनी केला. आवश्यक मंजुरी मिळाली नसतानाही क्लस्टर उद्घाटनाची लगीन घाई का? असा सवालही डावखरे यांनी केला. तर क्लस्टर प्रकल्पावरून नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होता कामा नये. अन्यथा, क्लस्टरची एसआरए होईल, अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली.

हेही वाचाः- महापालिकेच्या फेरीवाला क्षेत्रांना दादरवासीयांचा विरोध

ठाणे शहर अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आ. डावखरे यांनी पहिल्यांदा पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते क्लस्टर प्रकल्पाच्या उद्घाटनावरून ते बोलत होते. या वेळी आमदार संजय केळकर, नगरसेवक संदीप लेले, कृष्णा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मढवी आदी उपस्थित होते. क्लस्टरच्या मंजुरीवेळी शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे ठिकठिकाणी पोस्टर्स लावले होते. तसेच विद्यमान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेत १८ सप्टेंबर २०१९ रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानणार्‍या शिवसेना नेत्यांना आता क्लस्टर प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यास विसर का पडला?, असा सवाल डावखरे यांनी केला. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस यांना बोलाविले पाहिजे. शिवसेनेला श्रेय घ्यायचे, तर त्यांनी घ्यावे. यापूर्वी महापालिकेच्या काही कार्यक्रमांना एक दिवस आधी मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे.उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अजून तीन दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंच शिवसेनेच्या नेत्यांना सद्बुद्धी होईल.

हेही वाचाः-महापालिका अर्थसंकल्प २०२०-२१: मुंबईकरांना काय मिळणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ भाजपावरील आकसापोटी फडणवीस सरकारने घेतलेले अनेक कल्याणकारी निर्णय रोखले. सध्याचे स्थगिती सरकार असून, अशा परिस्थितीत ठाणेकरांचे नशीब बलवत्तर असल्याने क्लस्टरला स्थगिती मिळाली नाही. म्हणून मुख्यमंत्री (chif minister) उद्धव ठाकरेंच्या हस्ते क्लस्टरचा उद्घाटन सोहळा होत आहे, असा टोला डावखरे यांनी मारला.

हेही वाचाः- पती-पत्नीच्या नावे घराची नोंदणी करणाऱ्यांना करामधून सूट द्या- शितल म्हात्रे

संबंधित विषय
ताज्या बातम्या