Advertisement

महापालिका अर्थसंकल्प २०२०-२१: मुंबईकरांना काय मिळणार?


महापालिका अर्थसंकल्प २०२०-२१: मुंबईकरांना काय मिळणार?
SHARES

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी मंगळवारी मुंबई महापालिकेचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करणार आहेत. २०१९-२० या वर्षात महापालिकेच्या महसुलात मोठी घसरण झाल्यामुळं पालिकेच्या आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पात काटकसरीला प्राधान्य देण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई महापालिकेला देशातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखलं जातं.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षांचा ३०६९२.५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळीही मालमत्ता कर आणि विकास नियोजन खात्याच्या महसुलात घट झाली होती.

बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे विकास नियोजन खात्याच्या महसुलातही घट झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मदत करावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वर्षांचा अर्थसंकल्प सादर करण्याचं मोठं आव्हान प्रवीणसिंह परदेशी यांच्यासमोर आहे.

महसूल घसरल्यानं आगामी अर्थसंकल्पाचं आकारमान घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई सागरी किनारा प्रकल्प, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प, सांडपाणी पुनप्र्रक्रिया केंद्र प्रकल्प, रस्ते बांधणी, जीर्ण जलवाहिन्या बदलणं आदी मोठ्या कामांसाठी आगामी वर्षांत महापालिकेला मोठा खर्च येणार आहे. त्याशिवाय अन्य लहान-मोठय़ा नागरी कामांसाठीही निधीची तरतूद करावी लागणार आहे.हेही वाचा -

भाजपच्या काळात फोन टॅपिंग? चौकशीसाठी समिती स्थापन

मुंबईकर रोहितची वनडे-कसोटीतून माघार, भारतीय संघाला मोठा धक्काRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा