Advertisement

मुंबईकर रोहितची वनडे-कसोटीतून माघार, भारतीय संघाला मोठा धक्का

हिटमॅन रोहित शर्मा (Hit-man Rohit Sharma) यानं दुखापत (Injured) झाल्यानं संघातून माघार मालिकेतून माघार घेतली आहे.

मुंबईकर रोहितची वनडे-कसोटीतून माघार, भारतीय संघाला मोठा धक्का
SHARES

भारत (Indian Cricket Team) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात टी-२० (T-20) मालिकेत भारतीय संघानं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारत व न्यूझीलंड यांच्यात वनडे-कसोटी (ODI-Test) मालिका रंगणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण हिटमॅन रोहित शर्मा (Hit-man Rohit Sharma) यानं दुखापत (Injured) झाल्यानं संघातून माघार मालिकेतून माघार घेतली आहे. 

न्यूझीलंडविरुद्ध माउंट माउंगनुई येथील बे ओव्हल मैदानावर झालेल्या पाचव्या व अंतिम टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पायाला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळं फलंदाजी करताना रोहितला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी देखील आला नाही. त्याच्या ऐवजी के. एल. राहुल (K.L. Rahul) यानं कर्णधारपदाची (Captain) जबाबदारी पार पाडली.

हेही वाचा - मनसेच्या मोर्चाचा मार्ग ठरला, ‘या’ मार्गावरून घुसखोरांविरूद्ध करणार आंदोलन

या दुखापतीमुळं न्यूझीलंडविद्धच्या आगामी ३ सामन्यांच्या वनडे आणि त्यानंतर होणाऱ्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रोहित खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळं रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करत होता. या सामन्यात रोहितनं ४१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६० धावा केल्या.

हेही वाचा - ३ वर्षांत २५ जलवाहिन्या फुटल्या, मेट्रो कामाचा मुंबईकरांना मनस्ताप

या खेळीत रोहितने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मधील अर्धशतक झळकावले. रोहितने टी-२० मध्ये २५ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. या सामन्यात रोहित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करण्याबाबत रोहितनं विराट कोहलीला मागे टाकले.

भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत ५-० असा विजय मिळवत इतिहास घडवला होता. जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला आतापर्यंत ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सर्व सामने जिंकता आले नव्हते. पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा पराक्रम केला.



हेही वाचा -

आत्महत्या करण्याच्या ट्विटवर पोलिसांची समयसूचकता, तरूणाचे वाचवले प्राण

मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, पर्यायी मार्गाचा वापर करण्याची पोलिसांची सूचना



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा