Advertisement

मनसेच्या मोर्चाचा मार्ग ठरला, ‘या’ मार्गावरून घुसखोरांविरूद्ध करणार आंदोलन

एका मार्गाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असली, तरी दुसऱ्या मार्गाला पोलिसांनी हिरवा कंदील दाखवल्याने आता याच मार्गावरून मनसे घुसखोरांविरूद्ध आंदोलन करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मनसेच्या मोर्चाचा मार्ग ठरला, ‘या’ मार्गावरून घुसखोरांविरूद्ध करणार आंदोलन
SHARES

भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना (illigal bangladeshi and pakistani citizens) हाकलून देण्याच्या मागणीसाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (mns) मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी मनसेने मुंबई पोलिसांना २ मार्ग सुचवले होते, त्यापैकी एका मार्गाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असली, तरी दुसऱ्या मार्गाला पोलिसांनी हिरवा कंदील दाखवल्याने आता याच मार्गावरून मनसे घुसखोरांविरूद्ध आंदोलन करणार आहे. 

हेही वाचा- तुझ्या बापाचं राज्य आहे का? मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शेलारांची जीभ घसरली

मुंबईत मोर्चा काढण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी मनसेने मुंबई पोलिसांकडे अर्ज केला होता. या अर्जात भायखळा जिजामाता उद्यान ते आझाद मैदान (byculla to azad maidan) आणि गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असे दोन मार्ग सुचवले होते. यापैकी भायखळा ते आझाद मैदान या मार्गावरून मोर्चा काढण्यास परवानगी मिळावी, असा मनसेचा आग्रह होता. परंतु कायदा व सुव्यवस्था बिघडण्याच्या शक्यतेने मुंबई पोलिसांनी (mumbai police) या मार्गावरून मोर्चा काढण्यास मनसेला परवानगी नाकारली. त्याऐवजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आली. 

भायखळा जिजामाता उद्यान ते आझाद मैदान (byculla to azad maidan) या मार्गावर मनसेने मोर्चा काढल्यास हा मोर्चा मोहम्मद अली रोड (muhammad ali road) परिसरातील मुस्लीम बहुल (muslim area) भागातून जाणार होता. त्यामुळे या मोर्चामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. शिवाय राज ठाकरे (raj thackeray) यांनी मुस्लिमांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न पोलिसांसमोर आहे. परिणामी हा मोर्चा दुसऱ्या मार्गावरून नेण्याची सूचना मुंबई पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर मनसेला केली. 

मनसेने याआधी रझा अकादमीविरूद्ध काढलेला मोर्चा मरीन ड्राइव्ह ते आझाद मैदान असाच होता. त्यामुळे मनसे पदाधिकारी आणि मुंबई पोलीस अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत पोलिसांनी याच मार्गावरून मोर्चा काढण्याची सूचना मनसेला केली. मनसेने हा पर्यायी मार्ग स्वीकारला असून हिंदू जिमखान्यापासून (hindu gymkhana) या मोर्चाची सुरूवात होणार आहे. रविवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता हा मोर्चा निघणार आहे.

हेही वाचा- मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, पर्यायी मार्गाचा वापर करण्याची पोलिसांची सूचना

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून पर्यायी मार्गावर अंतिम निर्णय घेतला आणि त्यानंतर मोर्चाच्या मार्गाची माहिती पोलिसांना कळवल्याचं म्हटलं जात आहे. यासंदर्भातील पोस्टरही मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा