Advertisement

तुझ्या बापाचं राज्य आहे का? मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शेलारांची जीभ घसरली

सीएए हा केंद्राचा कायदा आहे, महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ देणार म्हणजे तुझ्या बापाचं राज्य आहे का? अशी वादग्रस्त टीका शेलार यांनी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

तुझ्या बापाचं राज्य आहे का? मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शेलारांची जीभ घसरली
SHARES

महाराष्ट्रात सुधारीत नागरिकत्व कायदा (caa) लागू करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) आणि भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात एनआरसी (nrc) लागू होऊ देणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एनआरसीविरोधात पवित्रा घेतलेला असताना सीएए हा केंद्राचा कायदा आहे, महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ देणार म्हणजे तुझ्या बापाचं राज्य आहे का? अशी वादग्रस्त टीका शेलार यांनी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार

शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) सीएए आणि एनआरसीबाबत (caa and nrc) आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, शिवसेनेने (shivsena) काँग्रेस (congress), राष्ट्रवादीसोबत (ncp) मिळून महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi) स्थापन केलं असलं, तरी शिवसेनेने हिंदुत्व (hindutva) सोडलेलं नाही. सीएएमुळे कोणाच्या नागरिकत्वाला धक्का लागणार नाही. मात्र राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे केवळ मुस्लीम समुदायालाच नव्हे, तर हिंदुंनासुद्धा नागरिकत्व सिद्ध करणं जड जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी एनआरसीला विरोध दर्शविला.

उद्धव ठाकरे यांना उत्तर देताना भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार (bjp mla ashish ahelar) यांची जीभ घसरली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना शेलार म्हणाले की, “शिवसेना (shiv sena) सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. सीएए (caa) हा केंद्र सरकारचा कायदा आहे. त्यामुळे महाराष्ट्रा हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, असं वादग्रस्त वक्तव्य शेलार यांनी केलं.

हेही वाचा- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली शिवसेना, लवकरच राजकीय भूकंप होईल – रामदास आठवले

भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्या टीकेमुळे सीएए आणि एनआरसीवरून होणाऱ्या राजकारणात आणखीच तेल ओतलं गेलं आहे. महाराष्ट्रात सीएए लागू करण्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीत सध्या एकमत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्यात तीन पक्षांचं सरकार असल्याने इतर राज्यांप्रमाणे सीएएविरोधात प्रस्ताव आणण्यात आलेला नाही, असं स्पष्ट केलं आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा