Advertisement

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली शिवसेना, लवकरच राजकिय भूकंप होईल – रामदास आठवले

बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणार्‍या सीएए-एनआरसीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्मथन केले पाहिजे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली शिवसेना, लवकरच राजकिय भूकंप होईल –  रामदास आठवले
SHARES

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिमेबाबत शिवसेनेची (Shivsena) भूमिका अत्यंत कलुषित झाली आहे. बांगलादेशी (Bangladesh) व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणार्‍या सीएए-एनआरसीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्मथन केले पाहिजे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress-NCP) काँग्रेसच्या दबावामुळे ते भूमिका घेत नाहीत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री (Union Minister of State) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष (national president of the Republican Party of India)रामदास आठवले (ramdas Athawle) यांनी रविवारी केली.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. ते सीएए, एनआरसीच्या पाठिंब्यासाठीच अप्रत्यक्षपणे मोर्चा काढत आहेत, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंचे अभिनंदन केले. शनिवार पेठेत आरपीआयच्या नव्या मध्यवर्ती कार्यालयाचे आणि कायदेशीर मार्गदर्शन केंद्राचे उद््घाटन आठवले यांच्या हस्ते झाले. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. सीएए, एनआरसीबाबत देशातील मुस्लिमांना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हा कायदा नागरिकत्व देणारा असून, हिरावणारा नाही, असेही आठवलेंनी नमूद केले. दरम्यान, काही लोकांना वाचविण्यासाठी नव्हे, तर वाचलेल्यांना पकडण्यासाठी एल्गार परिषद प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविले आहे, असे म्हणत रामदास आठवले यांनी एल्गार प्रकरण एनआयकडे सोपविण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले.

राज्यात सरकार चालवताना शिवसेना ही काँग्रेसच्या दबावाखाली वावरत असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. शिवसेनेने विचारधारा सोडून काँग्रेसशी युती केली आहे. त्यामुळे या युतीची माती होईल. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे आठवले यांनी म्हटले. यावेळी रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयावरही सडकून टीका केली. महाविकासआघाडीकडून दिली जाणारी कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले. रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होईल, असे भाकीत वर्तविले होते. महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यात नक्कीच काहीतरी मोठे पाहायला मिळेल. यापूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूकंप केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा भूकंप झाला. आता कोणाचा भूकंप होणार, हे लवकरच समजेल. मात्र, कोणता ना कोणता भूकंप नक्की होणार, असे रामदास आठवले यांनी म्हटले होते.

हेही वाचाः- अखेर 'त्या' जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम पुर्ण

हेही वाचाः- 'हिरोईन' शब्दाचा अर्थ कर्तबगार महिला, बबनराव लोणीकरांची सारवासारव

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा