Advertisement

अखेर 'त्या' जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम पूर्ण

मुंबईतील हिल क्रिस्ट इमारतीजवळ (Hill Scrite Building) जलवाहिनी (Water Pipeline) फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया गेलं.

अखेर 'त्या' जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम पूर्ण
SHARES

मुंबईतील हिल क्रिस्ट इमारतीजवळ (Hill Scrite Building) जलवाहिनी (Water Pipeline) फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया गेलं. ही जलवाहिनी फुटल्यामुळं विलेपार्ले, वांद्रे, अंधेरी, जोगेश्‍वरी, घाटकोपर, कुर्ला आदी परिसरातील पाणीपुरवठा बंद (Water supply off) करण्यात आला होता. त्यामुळं अनेक रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. परंतु, महापालिकेच्या हायड्रोलिक विभागानं (Municipal Hydraulic Department) फुटलेल्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचं दुरूस्तीचं (Repairing) काम हाती घेतलं. तसंच, शनिवारी पाणीपुरवठा पुन्हा पूर्वरत केला.

वेरावली जलाशय भरण्याची प्रक्रिया महापालिकेनं (BMC) सुरू केल्यानं या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आणि मागील ३ दिवसांपासून पाण्यासाठी सुरू असलेली त्यांची वणवण संपली. मागील गुरुवारी सकाळच्या सुमारास जेव्हीएलआर येथील हिल क्रिस्ट इमारतीजवळ (Hill Scrite Building) मेट्रो-६च्या (Metro-6) पायलिंगचं काम सुरू असताना वेरावली जलाशयास जोडली गेलेली १८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली.

हेही वाचा - 'हाॅर्न नाॅट ओके प्लिज' द पनिशिंग सिग्नलचा मुंबईत बोलबाला

महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत (Department of Water Engineers) जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. या दुरुस्तीस्थळी महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी (Municipal Commissioner Pravin Pardeshi) व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू (Additional Municipal Commissioner P. Velarasu) यांनीही भेट देऊन पाहणी केली. जलवाहिनी दुरुस्ती कालावधीमध्ये नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल महापालिका प्रशासनानं आभार व्यक्त केले.

हेही वाचा - ‘त्या’ २७ गावांची वेगळी नगरपालिका करा, मनसे आमदाराने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

तत्पूर्वी, जलवाहिनी फुटल्‍यानंतर त्‍याठिकाणी युद्धपातळीवर सुरू असलेलं दुरुस्‍तीचं काम, शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पूर्ण झालं. दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर, रविवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, घाटकोपर, जोगेश्वरी, कुर्ला आदी भाग वगळता विलेपार्ले, अंधेरी परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होण्यास रविवारची संध्याकाळ उजाडली. तोपर्यत, चढ्या दरातील मिनरल बॉटल्स विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली. त्याशिवाय काहींना पाण्याचे टॅंकर बोलावून त्यातून पाणी भरलं.



हेही वाचा -

५५५ रुपयांचं तिकीट ५ हजार ५०० रुपयांना, प्रवाशाची फसवणूक

‘सीएए’ हा रौलेटसारखाच काळा कायदा, उर्मिला मातोंडकरची वादात उडी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा