'हाॅर्न नाॅट ओके प्लिज' द पनिशिंग सिग्नलचा मुंबईत बोलबाला

द पनिशिंग सिग्नल नामक यंत्रणेमुळे मुंबईत प्रवास करणाऱ्या वाहन चालक, मालक आणि मुंबईकरांना स्वत:हूनच काही गोष्टींचे बंधन घालून घ्यावे लागणार आहे. कारण ही यंत्रणाच तशी काम करणार आहे.

'हाॅर्न नाॅट ओके प्लिज'  द पनिशिंग सिग्नलचा मुंबईत बोलबाला
SHARES
गजबजलेल्या मुंबई मायानगरी सारख्या शहरात वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. माञ ही समस्या फक्त वाहतूक कोंडीपूर्ती मर्यादीत न राहता. वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे ध्वनी आणि हवेतल्या प्रदूषणात ही वाढ झाली आहे. यावर वाहतुक पालिसांनी चांगलीच शक्कल शोधुन काढली आहे. त्यामुळे सिग्नलवर हाॅर्न वाजवित असाल तर सावधान असा संदेशच एका व्हिडीओच्या माध्यमातून वाहतुक पोलिसांनी वाहनचालकांना दिला आहे. हा व्हीडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच वायरल झाला आहे. व्हीडिओसाठी प्रयोगाच्या स्वरूपात सिग्नलवर ही यंत्रणा बसवण्या आली होती. तिला चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात अशा यंत्रणा इतर ठिकाणीही वाहतुक पोलिस कार्यन्वित करणार आहेत.चौकांमध्ये सिग्नलदरम्यान, होणाऱ्या ध्वनिप्रदूषनाला आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी एफसीबी इंटरफेस कंपनीसोबत करार करत द पनिशिंग सिग्नल (The Punishing Signal) नामक एक यंत्रणा कार्यक्नित करायचा विचार केला आहे.द पनिशिंग सिग्नल नामक यंत्रणेमुळे मुंबईत प्रवास करणाऱ्या वाहन चालक, मालक आणि मुंबईकरांना स्वत:हूनच काही गोष्टींचे बंधन घालून घ्यावे लागणार आहे. कारण ही यंत्रणाच तशी काम करणार आहे. द पनिशिंग सिग्नल नामक यंत्रणा शांतता क्षेत्र असणाऱ्या भागात सुरु करण्यात येणार आहे.अनेक चालकांना वाटते की, जास्त वेळ हाॅर्न वाजवल्याने सिग्नल लवकर हिरवा होतो. परंतु आता याचा उलटा परिणाम दिसणार आहे. जितका जोरात हाॅर्न वाजेल तितकी आवाजाची तीव्रता मोजून ही यंञणा सिग्नल रिसेट करणार आहे. सध्या सीएसएमटी, मरिन ड्राइव्ह, पेडर रोड, हिंदमाता, वांद्रे आदी परिसरांत ही यंञणा बसवण्यात आली आहे. ही यंञणा थेट सिग्नलशी जोडली आहे. मोजलेल्या आवाजाची तीव्रता सिग्नलजवळ असलेल्या डिस्प्लेवर दिसते. हाॅर्नच्या आवाजाने 85 डेसिबलची मर्यादा ओलांडली की, सिग्नल रिसेट होतो. त्यामुळे सिग्नलवर अधिकवेळ थांबावे लागते. यामुळे त्याचे तंतोतंत पालन केल्यास सिग्नल वेळेत हिरवा होऊन वेळ कमी जाईल, आणी दुसरे म्हणजे ध्वनी प्रदुषण होणार नाही. सध्या  हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतोय, याकडेलक्ष असल्याचे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबई पोलीसांनी द पनिशिंग सिग्नल नामक यंत्रणेचा प्रसार शहरभर सुरु केला आहे. मुंबई पोलीसांनी त्याबाबत ट्विटरवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हडिओत या यंत्रणेबद्दल माहिती सांगण्यात आली आहे. Horn not okay, please! असे म्हणत पोलिसांनी या यंत्रणेचे कॅम्पेन सुरु केले आहे.

लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वाहतुक पोलिसांनी सिग्नल परिसरात आवाज मोजणारी यंञणा बसविली आहे. या यंञणेसंदर्भात माहिती देणारा व्हिडिओ पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये यंञणा हाॅर्नच्या आवाजाची तीव्रता मोजताना दिसते. वाहन चालकांकडून वाजविल्या जाणाऱ्या हाॅर्नची तीव्रता 85 डेसिबलपेक्षा जास्त असल्यास सिग्नल रिसेट होतो. त्यामुळे चालकांना अधिकवेळ सिग्नलवर थांबावे लागते. चालकांनी जास्त हाॅर्न न वाजवता संयम ठेवून सिग्नल सुटण्याची वाट पाहावी, अन्यथा पोलिसांच्या या आगळ्या वेगळ्या शिक्षेला सामोरे जावे.
संबंधित विषय