Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार

उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ठाकरेंनी याबाबतचा खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्या शपतविधीनंतर चर्चारंगू लागल्या त्या उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार की, विधान परिषदेवर जाणार याची.  विधानसभा निवडणूकीवेळी आदीत्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्यासाठी मतदारसंघांची चाचपणी सुरू होती. त्यावेळी शिवसेने (Shivsena)च्या बालेकिल्यातील उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले होते. मात्र उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ठाकरेंनी याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचाः- 'हिरोईन' शब्दाचा अर्थ कर्तबगार महिला, बबनराव लोणीकरांची सारवासारव

विधानसभेवर जायचं म्हणजे जो निवडून आला असेल त्याला राजीनामा द्यायला लावून परत निवडणुका घ्याव्या लागतील. त्यात वेळ, शासनाचा पैसा वाया जातो. त्यापेक्षा विधानसभेत कुणाला ही न दुखावता, विधान परिषदेवरील कुणी विधानसभेत निवडून गेला असेल, त्या रिक्त जागेवर जाता येत असले. तर का नाही जायचं? मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून हे सगळं बोलायला ठीक आहे. मग मी तर म्हणेन, मी छपरातून आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री होण्याआधी मी त्या विधान भवनात आयुष्यात दोन-चार वेळेहून अधिक गेलो नसेन. असं देशात अपवादात्मक परिस्थितीत झालं असेल की, एखादी व्यक्ती जी तिकडे येण्याचं कधी स्वप्न नव्हतं ती व्यक्ती येते तेच मुख्यमंत्री म्हणून. मी नेहमी सांगतो, जबाबदारीतून मी कधी पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. त्यामुळे कुणालाही न दुखावता जे शक्य असेल ते मी करेन.

हेही वाचाः- फडणवीसांनी कोट्यावधी रुपये जाहिरातीवर उधळले

सत्तेसाठी वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्याची टीका भाजपकडून केली जाते. यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, करूद्या त्यांना टीका. पण मग माझा प्रश्न असा आहे, पक्ष फोडून आणलेली माणसं तुम्हाला चालतात. मग त्या पक्षासोबतच हात मिळवला तर काय फरक पडतो? त्या पक्षातले मोठमोठे नेते घेऊन भारतीय जनता पक्षातसुद्धा त्यांना सामावून घेतलंच आहे ना. कित्येक नेते काँग्रेसमधून त्यांनी घेतलेत. त्यांना आमदारक्या, खासदारक्या किंवा इतर काही गोष्टीसुद्धा दिल्या आहेत. तेसुद्धा त्या विचारधारेवरच होते ना?

हेही वाचाः- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली शिवसेना, लवकरच राजकिय भूकंप होईल – रामदास आठवले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा