Advertisement

फडणवीसांनी कोट्यावधी रुपये जाहिरातीवर उधळले

फडणवीस सरकारने २0१७-१८ साली टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातींवर तब्बल ५,९९,९७,५२0 रुपये खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे.

फडणवीसांनी कोट्यावधी रुपये जाहिरातीवर उधळले
SHARES
राज्याचे माजी मुख्यमंत्री (Ex chif Minister) आणि सध्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वृत्तपत्र जाहिरात खर्च वगळता फक्त टीव्ही (TV) आणि रेडिओ (radio channels) वाहिन्यांवर जाहिरातींसाठी गेल्या पाच वर्षात दिवसाला तब्बल ८५ हजार रुपये शासकीय तिजोरीतून खर्च केल्याची माहिती नुकतीच माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. बारामती तालुक्यातल्या सोमेश्‍वरनगर येथील नितीन यादव यांनी ही माहिती मागवली होती.

हेही वाचाः- छ. उदयनराजे भोसले राज्यसभेवर

नितीन यादव यांनी माहिती अधिकारात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय (Directorate General of Public Relations) मार्फ त फडणवीस यांच्या कार्यकाळातील महाराष्ट्र शासना(Government of Maharashtra)चा टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवरील जाहिराती( Advertising)साठी करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील मागवला होता. यात काही तपशील उघडकीस आले आहेत. फडणवीस सरकारने २०१७-१८ साली टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातींवर तब्बल ५,९९,९७,५२० रुपये खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे. तर याच वर्षी रेडिओ जाहिरातींवर १ कोटी २० लाख ६९ हजार ८७७ रुपयांचा खर्च केला आहे.

हेही वाचाः- स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र चौथा

फडणवीस सरकारच्या काळात २०१३-२०१४ रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातीवर केलेला खर्च २०१३-२०१४ साली ५९, ९६, २९१ रुपये इतका होता, तो वाढून २०१८-२०१९ साली १,८५,७२,८८७ झाल्याचे दिसत आहे. तर टीव्ही वाहिन्यांवर जाहिरातीसाठी केलेला खर्च २०१३-२०१४ साली ५३,२५,७३० रुपये होता, तो २०१८-२०१९ साली वाढून तब्बल २,८४, ४८,३१७ रुपये झाल्याची माहिती या माहिती अधिकारातून मिळाली आहे. पाच वर्षाचे १५ कोटी ५१ लाख रुपये जाहिरातींवर खर्च करण्यात आले असून दिवसाचा हिशोब काढला असता ८५ हजार रुपये खर्च केला असल्याचा दावा यादव यांनी केला आहे.

हेही वाचाः- अखेर 'त्या' जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम पुर्ण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा