Advertisement

छ. उदयनराजे भोसले राज्यसभेवर

महाराष्ट्रात श्री.छ.भोसले यांच्यामुळे भाजपचे कोमजलेले कमळ पुन्हा फुलेल अशी अपेक्षा भाजप वरिष्ठ नेत्यांना आहे

छ. उदयनराजे भोसले राज्यसभेवर
SHARES

छत्रपतींची राजधानी असलेल्या सातार्‍यामधून सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लोकसभा खासदार म्हणून निवडणून आलेले श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पक्ष बदलला आणि पोटनिवडणुकीला सामोरे गेले. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर श्री. छ. भोसले यांच्या राजकीय कारकीर्दीला काहीसा ब्रेक मिळाला आहे. परंतु आता एप्रिल महिन्यात राज्यसभेची निवडणूक होणार आहे. यावेळी श्री.छ.भोसले यांची राज्यसभेवर नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त होत असून उदयनराजे सर्मथकांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

हेही वाचाः-५५५ रुपयांचं तिकीट ५ हजार ५०० रुपयांना, प्रवाशाची फसवणूक

केंद्र व राज्यात सध्या राजकिय परिस्थिती फार विचित्र झालेली आहे. केंद्रात एकमेकांशी मैत्री करणारे राज्यात विरोधक बनले आहेत. तर राज्यात विरोधक मित्र झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील ७ राज्यसभेचे सदस्य नवृत्त होत असून २ एप्रिल रोजी राज्यसभेवर खासदार निवडून देण्यासाठी निवडणूक होत आहे. या निवडीमध्ये सहा सदस्य पक्षीय बलाबलानुसार निवडून येऊ शकतात मात्र सातव्या जागेसाठी अपक्षांच्या कुबड्या घेणे याशिवाय गत्यंतर राहिले नाही. भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभा सदस्य झालेले व विद्यमान मंत्री रामदास आठवले, संजय काकडे, अमर साबळे, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, राष्ट्रवादीचे शरद पवार, अँड.माजीद मेमन असे सात सदस्य निवृत्त होत आहेत. भाजपमध्ये गेलेले सातारचे माजी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी भाजप वरिष्ठ नेते अनुकूल झाले असून त्यांचे राजकीय पुनर्वसन भाजपला फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचाः-स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र चौथा

मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या महाराष्ट्रात श्री.छ.भोसले यांच्यामुळे भाजपचे कोमजलेले कमळ पुन्हा फुलेल अशी अपेक्षा भाजप वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे तीन जागांपैकी रामदास आठवले, श्री.छ.उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या यांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाकडून खासदारकीला श्री.छ.भोसले निवडून आले होते. पण त्यांनी विकासाच्या मुद्यावर खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमधून पुन्हा निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. हे शल्य त्यांच्यापेक्षा त्यांच्या सर्मथकांना अस्वस्थ करत होते.

हेही वाचाः- विमा पॉलिसीवर खुश नसल्यास ती परत करू शकता, 'हा' आहे नियम

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा