Advertisement

विमा पॉलिसीवर खुश नसल्यास ती परत करू शकता, 'हा' आहे नियम

आपण विमा पॉलिसी (Insurance policy) घेतल्यास आणि खरेदी केलेल्या पॉलिसीवर समाधानी नसल्यास आपण ती पाॅलिसी परत देखील करू शकता.

विमा पॉलिसीवर खुश नसल्यास ती परत करू शकता, 'हा' आहे नियम
SHARES

आपण विमा पॉलिसी (Insurance policy) घेतल्यास आणि खरेदी केलेल्या पॉलिसीवर समाधानी नसल्यास आपण ती पाॅलिसी परत देखील करू शकता. बऱ्याच विमा कंपन्या (Insurance companies) आपणास असा पर्याय देतात की, जेव्हा आपण विमा खरेदी करता तेव्हा त्याचा आढावा घेण्यासाठी थोडा वेळ घ्या, जर तुमच्या मनात नसेल तर विमा परत करा. जेव्हा आपण कोणताही विमा घेता तेव्हा अटी आणि शर्ती दिल्या जातात. ज्यामध्ये आपण किती कालावधीनंतर विमा परत करू शकतो याची माहिती दिलेली असते. विमाधारकास असे पर्याय देणे बंधनकारक आहे. कायदेशीररित्या विमाधारकास विमा कंपनीने या प्रकारची सुविधा तसेच काही कालावधी देणे आवश्यक आहे जेणेकरुन विमाधारकास विमा योग्यरितीने समजू शकेल. त्यानंतर विमा घेणारा विमा परत करू शकतो आणि आपले पैसे घेऊ शकतो.

जीवन विमा

जीवन विमा (Life insurance) खरेदी करण्याची प्रक्रिया प्रस्ताव फॉर्म भरण्यापासून सुरू होते. फॉर्ममध्ये, विमा कंपनीला (Insurance companies)विमा काढण्यासाठी आपल्याबद्दल जाणून घ्यायची सर्व माहिती मिळते. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल. सर्वसाधारणपणे, विमाधारकास पहिल्या वर्षाचा विमा हप्ता भरावा लागतो. नंतर विमा कंपनी तुम्हाला निवडलेले उत्पादन, आपले वय आणि विमा रक्कम यासारख्या घटकांवर अवलंबून वैद्यकीय तपासणी करण्यास सांगू शकतात. या चाचण्यांचे पैसे विमा घेणाऱ्याकडून दिले जातात. एकदा विमा उतरवणारा आपणाचा विमा उतरवण्यास कबूल झाला की तो पॉलिसीची कागदपत्रे पाठवेल. फ्री-लुक पीरियड जेव्हा आपण पॉलिसी दस्तऐवज प्राप्त करता तेव्हाचा असतो. विमाधारकाला पॉलिसीच्या कागदपत्रांचे पुनरावलोकन करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी द्यावा लागतो. आपल्याला पाॅलिसी परत करायची असल्यास 15 दिवसांच्या आत परत करू शकतो.

आरोग्य विमा

आरोग्य विमा (Health insurance) पॉलिसीमध्ये 15 दिवसांचा फ्री-लुक (आपल्या विम्याचा आढावा घेण्याची वेळ) पिरीयड मिळतो. आरोग्य विमा सहसा एका वर्षासाठी असतो. त्यानंतर दरवर्षी हा विमा नूतनीकरण करावा लागतो. फ्री-लुक केवळ पहिल्यांदा खरेदी केलेल्या विम्यावर लागू होतोय नूतनीकरणावर फ्री-लुक लागू होणार नाही. आपण पॉलिसीची कागदपत्रे प्राप्त केल्यापासून फ्री-लुक पिरीयड सुरू होतो. आपण या काळात पॉलिसी परत केल्यास, विमा कंपनी आपण कव्हर केलेल्या दिवसांसाठी मुद्रांक शुल्क आणि विमा किंमतीचा निव्वळ प्रीमियमचे पैसे देईल. विमा कंपनी दरवर्षी नूतनीकरण केलेल्या वैद्यकीय योजनांसाठीच्या वैद्यकीय चाचण्यांच्या किंमतीपैकी कमीत कमी 50% पैसे विमाधारकास देतात. आपण पॉलिसी परत केल्यास आणि विमा कंपनीने पैसे आपल्याला परत केल्यास ही किंमत प्रीमियममधून वजा केली जाईल.


हेही वाचा -

राहुल बजाज सोडणार बजाज ऑटोचं अध्यक्षपद

नारायण मूर्ती जेव्हा रतन टाटांच्या पाया पडतात...

SBI चा ग्राहकांना अलर्ट, या' कारणामुळं खातं होणार फ्रीझ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा