Advertisement

'मुंबईत दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत मुख्यमंत्र्यांची भेट, मग ऊत येणारच…'

सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बागच्या (delhi shaheen bagh) धर्तीवर मुंबईतील मुस्लिम महिला (muslim womens protest) गेल्या २ दिवसांपासून नागपाडा (nagpada) इथं रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

'मुंबईत दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत मुख्यमंत्र्यांची भेट, मग ऊत येणारच…'
SHARES

सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बागच्या (delhi shaheen bagh) धर्तीवर मुंबईतील मुस्लिम महिला (muslim womens protest) नागपाडा (nagpada)  इथं रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने केवळ मुंबईच नाही, तर देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी एका कार्यक्रमात ‘रझा अकादमी’च्या (raza academy) पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यावरून भाजपकडून (bjp) त्यांना टीकेचं लक्ष्य केलं जात आहे. 

हेही वाचा- कोरिओग्राफर गणेश आचार्य पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, सह कलाकाराने दिली पोलिसांत तक्रार

नागापाडा (nagpada) या मुस्लिमबहुल भागातील महिला सीएए (caa) आणि एनआरसी (nrc) विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. केंद्र सरकार जोपर्यंत हा कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन करतच राहणार असा पवित्रा या महिलांनी घेतला आहे. हे आंदोलन मागे घेण्यात यावं, अशी विनंती वारंवार मुंबई पोलिसांकडून (mumbai police) करण्यात येत असतानाही या महिलांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. परिणामी या भागातील इतर रहिवाशांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागत आहे. राज्य सरकारकडून देखील या आंदोलनकर्त्यांना आवरण्याचा म्हणावा तसा प्रयत्न होत नसल्याचा आरोप करत भाजपने सरकारवर टीका सुरू केली आहे.

त्यातच काही दिवसांपूर्वी ‘रझा अकादमी’च्या (raza academy) पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत सीएए आणि एनआरसी विरोधात मत मांडल्यावर मुख्यमंत्र्यांनी आपण सगळे या देशाचे नागरिक आहोत. या देशातून काढण्याचा कुणालाही अधिकार नाही, त्यामुळे महाराष्ट्रात कुठल्याही समुदायावर अन्याय होऊ देणार नाही, असं आश्वासन दिल्याची माहिती रझा अकादमीतर्फे देण्यात आली होती. रझा अकादमीवर मुंबईत हिंसाचार (violence) केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या भेटीवरुन भाजपकडून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं जात आहे. 

हेही वाचा- 'फटका गँग'ला रोखण्यासाठी रेल्वे उभारणार टेहळणी बुरूज

भाजप नेते आमदार अतुल भातखळकर (mla atul bhatkhalkar) यांनी ट्विटरवर एक पोस्ट टाकत मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे. मुंबईत शाहीनबागचा तमाशा सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे प्रकार बंद होते. मुंबईत दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत (raza academy) खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करत असल्यावर अशा प्रकारांना ऊत येणारच असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा