कोरिओग्राफर गणेश आचार्य पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, सह कलाकाराने दिली पोलिसांत तक्रार

गणेश आचार्य हुद्द्याचा वापर करुन आपल्याला या संघटनेमधून काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत होते. ज्याच्या मुळे तिचे उत्पन्न बंद झाले.

कोरिओग्राफर गणेश आचार्य पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, सह कलाकाराने दिली पोलिसांत तक्रार
SHARES
बाँलीवूडमध्ये अनेक कलाकारांना आपल्या तालावर नाचवणारा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य पून्हा एकदा वादात सापडला आहे. गणेशसोबत सहाय्यक नृत्य दिग्दर्शक म्हणून काम पाहणाऱ्या 33 वर्षीय महिलेने गणेश विरोधात अंबोली पोलिसात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत गणेश आणि इतर दोन व्यक्ती विरोधात मारहाण शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी आपत्कालिन नोंद घेतली आहे.

पीडित महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, Indian Film & Television Choreographers Association चे कोरिओग्राफर गणेश आचार्य हे सचिव आहेत. त्याच्याजवळ पीडित महिला ही मागील अनेक वर्षांपासून काम करते. माञ काही कारणांवरून दोघांमध्ये खटकले होते. त्यावरून गणेश आचार्य पीडितेला दुसरीकडे काम मिळत असल्यास अडथळा निर्माण करत होते. तसेच आपल्या हुद्द्याचा वापर करुन आपल्याला या संघटनेमधून काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत होते. ज्याच्या मुळे तिचे उत्पन्न बंद झाले.  


26 जानेवारीला या अन्य इंडस्ट्रीतील नृत्यदिग्दर्शकांचा विशेष मेळावा रहेजा क्लासिक क्लबमध्ये आयोजित करण्यात आला होता. तेव्हा पीडित महिलाही तेथे आली होती. त्यावेळ गणेश आचार्यंनी तिला तेथून हटकवले. त्यावेळी गणेश यांच्यासोबत असलेल्या इतर दोन सहकार्य़ांनी तिला धक्काबुक्की करत, शिवीगाळ केल्याचा आरोपी पीडितेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास करीत आहे. या पूर्वी अभिनेञी तनुश्री दत्ता हिने मानसिक व लैगिक छळ केल्याचा आरोप गणेशवर केला होता. त्यामुळे चांगलेच वादंग निर्माण झाले होते. 



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा