Advertisement

'फटका गँग'ला रोखण्यासाठी रेल्वे उभारणार टेहळणी बुरूज

लोकलमध्ये दिवसाला शेकडो फोन चोरीला जातात. तर महिन्याला नोंद होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या ही कमीत कमी १०हजारांच्या वर आहे. हे

'फटका गँग'ला रोखण्यासाठी रेल्वे उभारणार टेहळणी बुरूज
SHARES

मुंबई (mumbai)त दररोज लाखो नागरिक रेल्वे(railway)ने प्रवास करतात. मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता  ही गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे आणि त्या पाठोपाठ खिसेकापूंची संख्या ही, मुंबईच्या लोकलमधील या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानकांदरम्यान टेहळणी बुरुज (watch tower) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दूरवर नजर ठेवणे सोपे असून संशयास्पद हालचालीवर तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे.

हेही वाचाः- कोरिओग्राफर गणेश आचार्य पून्हा वादाच्या भोवऱ्यात, सह कलाकाराने दिली पोलिसात तक्रार

मुंबईच्या लोकलमध्ये दिवसाला शेकडो फोन (mobile ) चोरीला जातात. तर महिन्याला नोंद होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या ही कमीत कमी १०हजारांच्या वर आहे. हे आकडे पाहून तुम्ही अंदाज लावू शकता. की मुंबईच्या लोकलमध्ये कशा पद्धतीने भूरट्या चोरांनी धूमाकूळ घातला आहे. अनेकदा हे चोर रंगेहाथ किंवा पोलिसांच्या जाळयात अडकतात. मात्र जामीनावर त्यांची मुक्तता झाल्यानंतर ते पून्हा रेल्वेत चोऱ्या करण्यास सुरूवात करतात. सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटिव्हींचा ही धाक या चोरट्यांना राहिलेला नाही. तर अनेक ठिकाणी पटऱ्यांवर उभे राहून दरवाजात फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीच्या हातावर फटका मारून त्याचा फोन चोरण्याचे प्रकारात ही वाढ झाली आहे.

हेही वाचाः- ३ वर्षात पूर्ण होणार मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे

हे वाढते गुन्हे रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जास्त वरदळ असलेल्या स्थानकावर टेहळणी केंद्रची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील अतिसंवेदशील ठिकाणी हे वॉच टॉवर उभारण्यात येणार आहे. धावत्या लोकल रेल्वे च्या प्रवाशांवर आसपासच्या परिसरातून फटकेबाजी करणा-यांची संख्या कमी नाही. अशा लोकांना लगाम घालण्यासाठी ही नवीन योजना राबविण्यात येणार आहे. ज्यात वॉच टॉवर द्वारे अशा महाभागांवर लक्ष ठेवले जाईल. धावत्या लोकलवर अनेकदा हल्ला होत असलेली अतिसंवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणांवरील हालचाली टिपण्यासाठी वॉच टॉवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रस्ताव बनवण्यात येत असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर वॉच टॉवरच्या माध्यमातून सतत हल्ला होणाऱ्या ठिकाणांवरील संशयास्पद हालचाली टिपणे शक्य होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचाः- डीएचएफलच्या अडचणींमध्ये भर, कपिल वाधवानला अटक

कल्याण-टिटवाळासह, पारसिक बोगदा आणि वडाळा-मानखुर्द परिसरात हे वॉच टॉवर उभारण्यात येणार आहेत. सध्या, स्थानकांदरम्यान अतिसंवेदनशील ठिकाणी सुरक्षा यंत्रणेचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. मात्र जमिनीवर असल्याने मर्यादित भागात नजर ठेवली जाते. त्यामुळे गुन्हेगारांकडून नवी ठिकाणे निर्माण होत आहेत. हे टाळण्यासाठी वॉच टॉवरवर सशस्त्र कर्मचाऱ्याला तैनात करण्यात येईल. तसेच रात्रीच्या वेळी नजर ठेवण्यासाठी उच्च क्षमतेचे दिवे आणि दुर्बिण असे साहित्यही या वॉच टॉवरवर असेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा