Advertisement

३ वर्षात पूर्ण होणार मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे

मुंबई (mumbai) ते दिल्ली(delhi) रस्त्याने कमीत कमी वेळात पोहोचण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होऊ शकेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे प्रकल्प तीन वर्षात तयार होईल असं म्हटलं आहे.

३ वर्षात पूर्ण होणार मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे
SHARES

मुंबई (mumbai) ते दिल्ली(delhi) रस्त्याने कमीत कमी वेळात पोहोचण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होऊ शकेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे प्रकल्प तीन वर्षात तयार होईल असं म्हटलं आहे. कारने दिल्ली ते मुंबई १२ तासांत पोहोचता येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.  

या महामार्गासाठी ३.१० लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर १० लाख झाडेही लावण्यात येणार आहेत. ५० कि.मी. च्या अंतरावर पेट्रोल पंप, रेस्टॉरंट्स यासह सोलर प्लांट आणि रेनहार्वेस्टिंग सिस्टम देखील बसविण्यात येणार आहेत. यासह एक्सप्रेस वेच्या दोन्ही बाजूला शहर, औद्योगिक क्षेत्र व वाहतूक शहरही उभारले जाणार आहे. एक्स्प्रेस वेच्या ४० टक्के कामाचं कंत्राटही देण्यात आले असून उर्वरित ५० टक्के कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसंच भूसंपादनाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

दिल्ली-मुंबई हा देशातील सर्वात लांब एक्सप्रेस वे असेल. या एक्सप्रेस वे ची लांबी १३२० किमी असेल. या द्रुतगती मार्गाच्या सहाय्याने दिल्ली ते मुंबई या प्रवासाची वेळ २४ तासांवरून १२ तासांपर्यंत येणार आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील मागास व आदिवासी जिल्ह्यांमधून जातो.  एक्स्प्रेस वे बनविल्यामुळे गुडगाव ते मुंबई हे अंतर १४५० किमी वरून १२५०किमी पर्यंत कमी होईल.

हा एक्सप्रेस वे ८ लेनचा बनविला जाईल. याद्वारे अवघ्या १२ तासांत मुंबई गाठता येते. हा एक्स्प्रेस वे तयार झाल्यावर दिल्ली आणि मुंबईदरम्यान ६ किंवा ७ ट्रिप करणारा ट्रक ११ ते १२ ट्रिप करू शकतो. 

  • दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे प्रकल्प तीन वर्षात तयार होणार
  • कारने दिल्ली ते मुंबई १२ तासांत पोहोचता येईल
  • दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे ८ लेनचा असेल

हेही वाचा -

अपघात रोखण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टॅक्टटाइल एजलाइन तंत्रज्ञान

आंगणेवाडी जत्रेसाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष एक्स्प्रेस




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा