Advertisement

आंगणेवाडी जत्रेसाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष एक्स्प्रेस

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील आंगणेवाडीतील भराडीदेवीची जत्रा यंदा १७ फेब्रुवारी २०२० दिवशी होणार आहे. या जत्रेसाठी हजारो भावीक दरवर्षी मुंबईतून जात असतात. या भाविकांसाठी आंगणेवाडीला जाण्यासाठी पश्चिम रेल्वे २ विशेष एक्स्प्रेस ट्रेन सोडणार आहे.

आंगणेवाडी जत्रेसाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष एक्स्प्रेस
SHARES

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील आंगणेवाडीतील भराडीदेवीची जत्रा यंदा १७ फेब्रुवारी २०२० दिवशी होणार आहे. या जत्रेसाठी हजारो भावीक दरवर्षी मुंबईतून जात असतात. या भाविकांसाठी आंगणेवाडीला जाण्यासाठी पश्चिम रेल्वे २ विशेष एक्स्प्रेस ट्रेन सोडणार आहे. वांद्रे टर्मिनस-थिविम (०९०९१) आणि थिविम-वांद्रे टर्मिनस या विशेष एक्स्प्रेस आंगणेवाडी जत्रे (Anganewadi Jatra) साठी पश्चिम रेल्वे (Western Railway) सोडणार आहे. 

वांद्रे टर्मिनस-थिविम एक्स्प्रेस (Bandra Terminus-Thivim Express) १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.४५ वाजता सुटेल. ही गाडी थिविम येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता पोहोचेल. तर  थिविम-वांद्रे टर्मिनस (Thivim-Bandre Terminus) ही विशेष एक्स्प्रेस थिविमहून १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १.५० वाजता सुटेल. ती वांद्रे टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पोहोचेल. या दोन्ही विशेष एक्स्प्रेस बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड मार्गे जाणार आहेत. 

 आंगणेवाडी जत्रेसाठी मध्य रेल्वेही ३ विशेष एक्स्प्रेस मुंबईतून सोडणार आहे.  लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) आणि पनवेल ( Panvel) हून सावंतवाडी, थिवि आणि करमाळीसाठी विशेष एक्स्प्रेस सोडल्या जाणार आहेत. १४ फेब्रुवारी रोजी एलटीटी (हेही वाचा -Lokmanya Tilak Terminus)  ते सावंतवाडी रोड (Sawantwadi Road) विशेष एक्स्प्रेस (Special Express)  लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) वरून मध्यरात्री १.१० वाजता सुटेल. ही एक्स्प्रेस त्याच दिवशी दुपारी १२.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे. त्यानंतर ही एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीला दुपारी १.३० वाजता परतीच्या प्रवासाला निघून एलटीटीला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० वाजता पोहोचेल. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. 

१४ फेब्रुवारी रोजी एलटीटी Lokmanya Tilak Terminus) ते थिवि विशेष एक्स्प्रेस एलटीटीहून रात्री ८.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता सावंतवाडी रोड (Sawantwadi Road) येथे पोहोणार आहे. तर, परतीच्या प्रवासासाठी थिविहून १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.५५ वाजता सुटणार आहे. ही ट्रेन एलटीटीला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थान (Lokmanya Tilak Terminus) कांवर थांबा देण्यात येईल.

  • सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील आंगणेवाडीतील भराडीदेवीची जत्रा यंदा १७ फेब्रुवारी २०२० दिवशी होणार आहे.
  • भाविकांसाठी आंगणेवाडीला जाण्यासाठी पश्चिम रेल्वे २ विशेष एक्स्प्रेस ट्रेन सोडणार आहे. 



हेही वाचा -

लोकलमध्ये या कारणांमुळे लागली मराठी पाटी

बेस्ट बसही २४ तास सुरू राहणार

तेजस एक्स्प्रेसला जोडणार अतिरिक्त एक डबा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा