Advertisement

बेस्ट बसही २४ तास सुरू राहणार

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) मध्यरात्रीपासून मुंबई (mumbai) मध्ये नाइटलाइफ (Nightlife) सुरू झालं आहे. मुंबई २४ तास सुरू राहणार आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासन (Best Administration) २४ तास बेस्टची सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे.

बेस्ट बसही २४ तास सुरू राहणार
SHARES

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) मध्यरात्रीपासून मुंबई (mumbai) मध्ये नाइटलाइफ (Nightlife) सुरू झालं आहे. मुंबई २४ तास सुरू राहणार आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासन (Best Administration) २४ तास बेस्टची सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. मात्र, रात्रभर सुरू राहणाऱ्या मुंबईचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर  बेस्ट प्रशासन रात्रभर बेस्ट बस (Best bus) सुरू करणार आहे. 

मध्यरात्रीच्या वेळेत वातानुकूलित मिनी बस (Air-conditioned mini bus) चालवण्याचा बेस्ट विचार करत आहे. मुंबईच्या नाइटलाइफ (Nightlife) चार दिवस आढावा घेतल्यानंतर त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर २४ तास बेस्टची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. २४ तास सेवा दिल्यामुळे बेस्टच्या प्रवाशी (passenger) संख्येत आणि उत्पन्नात वाढ होण्याचा अंदाज आहे. मुळेच बेस्टने २४ तास (24 hours) सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या बेस्टची मध्यरात्री साडे बारा वाजेपर्यंत सेवा आहे. आता प्रथम मध्यरात्री २ पर्यंत बस सुरू ठेवण्याचा विचार असणार आहे. याला मिळणारा प्रतिसाद पाहून पहाटे ४ पर्यंत बस सेवा सुरू ठेवली जाईल. 

नाइटलाइफमध्ये मॉल्स, हॉटेल्स, मार्केट इत्यादी गर्दीच्या ठिकाणांचा बेस्ट प्रशासन ४  दिवसांत आढावा घेणार आहे.  नाइटलाइफला मिळणारा प्रतिसाद यामध्ये पाहिला जाणार आहे. लोकांकडून नेमक्या कोणत्या वाहतूक सेवांना प्राधान्य दिले जात आहे. त्यांना येणाऱ्या अडचणी याची माहितीही आढाव्यात घेण्यात येईल आणि त्यानंतर २४ तास बेस्ट सेवा देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.  सध्या बेस्ट बसचे पाच किलोमीटरसाठी ५ रुपये आणि वातानुकूलित गाडीसाठी ६ रुपये भाडेदर तिकीट दर आहे. भाडे कपात करण्यापूर्वी बेस्टचे रोज १९ लाख प्रवासी होते. भाडे कपात केल्यानंतर प्रवाशांची संख्या ३४ लाख झाली. जास्तीत जास्त प्रवासी व उत्पन्न मिळवण्यावर सध्या बेस्टकडून भर दिला जात आहे.

मुंबईत सध्या पहाटे ६ वाजता पहिली बस  सुरू होते. मध्यरात्रीच्या वेळेत लोकल ट्रेन (Local train) बंद असते. त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न आता बेस्ट प्रशासन  (Best Administration) करणार आहे. मध्य रेल्वे (Central Railway) वरील सीएसएमटी (csmt) येथून मुख्य मार्गावर शेवटची लोकल मध्यरात्री १२.३० वाजता सुटते, तर हार्बर (Harbor) वरील मध्यरात्री १२.४० आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट (Churchgate) येथून मध्यरात्री १ वाजता लोकल सुटते. अन्य स्थानकांतूनही मुंबईच्या दिशेने येणाऱ्या शेवटच्या लोकल या वेळेत बंद होतात. 


हेही वाचा -

तयार रहा, मुंबई पुन्हा गारठणार, हवामान खात्याचा इशारा

मुंबईत १२५ चिनी ड्रोन जप्त- सीमाशुल्क विभागाची कारवाई




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा