Advertisement

तयार रहा, मुंबई पुन्हा गारठणार, हवामान खात्याचा इशारा

पुढील दोन तीन दिवसानंतर महाराष्ट्राच्या काही भागांत थंडी वाढण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे.

तयार रहा, मुंबई पुन्हा गारठणार, हवामान खात्याचा इशारा
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत थंडीचा परिणाम काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र थंडीचा अनुभव या आठवड्यात पुन्हा घेता येणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या आठवड्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन तीन दिवसानंतर महाराष्ट्राच्या काही भागांत थंडी वाढण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. सरासरी किमान तापमानापेक्षा पारा खाली जाईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

तापमानात होणार घट

गेल्या एका आठवड्यापासून राज्यात कमाल तापमान ३० डिग्री सेल्सिअस इतके होते. तर काही ठिकाणी किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत इतके होते. उत्तर भारतात थंड वारे वाहू लागल्यानं पुढील दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई-पुणे मधील किमान आणि कमाल तपमान सरासरीपेक्षा खाली जाऊ शकते. त्याशिवाय २९ ते ३१ जानेवारी दरम्यान तापमानात आणखी घट होऊ शकते.

शनिवारी राज्याचे किमान तापमान १३ ते २० डिग्री सेल्सियस तर कमाल तापमान २८ ते ३४ अंशांदरम्यान नोंदवण्यात आले. या तापमानात महाराष्ट्रातील कोकण आणि मराठवाड्यात वाढ नोंदवली गेली. महाराष्ट्रातील कोकण आणि मराठवाड्यात तापमानात वाढ नोंदवली गेली. गोंदियामध्ये सर्वाधिक तापमान १२.२ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.

मुंबईकरांना जाणवणार गारवा

मुंबईसह राज्यात आठवड्याभरापूर्वी तापमानात घट झाल्यामुळे थंडीमध्ये बरीच वाढ झाली होती. यामुळे मुंबईकरांना थंडी जाणवत होती. पण अचानक तापमानात वाढ झाली. त्यामुळे गेला आठवडा मुंबईतून थंडी गायब झाली होती. पण बदलत्या हवामानामुळे पुन्हा एकदा मुंबईत गारवा अनुभवता येणार आहे

ऋतूंमध्ये बदल

मकर संक्रांतीनंतर गारठा कमी होऊ लागतो. हेच आतापर्यंत आपण मानत आलो आहोत. परंतु गेल्या काही वर्षांत ऋतूमध्ये अनेक बदल होत आहेत. २०१९ ला तर मुंबईतही थंडी मार्चपर्यंत जाणवत होती. याहीवर्षी थंडी अशी परतून येईल, असे संकेत देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे आता ऋतूमध्ये झालेल्या बदलांची माहिती भारतीय हवामान खातं लवकरच जाहीर करणार आहे.

विशेषतः मान्सूनमध्ये येणारा पाऊस जरा पुढे गेला आहे. पावसाच्या येण्याच्या तारखांमध्ये फार बदल होणार नसला तरीही परत जाण्याच्या तारखांमध्ये मात्र मोठा बदल झाला आहे. हा बदल भारतासारख्या कृषिप्रधान देशामध्ये शेतकरी व्यावसायिक सर्वसामान्य यांच्यासाठीची माहिती हवामान खातं एप्रिलमध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे. आता साधारणपणे पन्नास वर्षे जुन्या तारखा अजूनही वापरल्या जात आहेत. पण झालेले बदल मात्र आता जाहीर करण्यात येणार आहे.



हेही वाचा

राज्यभरात मुंबई सर्वाधिक प्रदूषित शहर

भारतीय खगोलप्रेमींसाठी यावर्षी 6 ग्रहणं

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा