मुंबईत १२५ चिनी ड्रोन जप्त- सीमाशुल्क विभागाची कारवाई

मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी असून कुठल्याही कार्यक्रमात ड्रोनचा वापर करण्यासाठी मुंबई पोलिसांची अधिकृत रित्या परवानगी घ्यावी लागते.

मुंबईत १२५ चिनी ड्रोन जप्त- सीमाशुल्क विभागाची कारवाई
SHARES

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमिवर ड्रोन उडवण्यावर बंदी असताना. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मुंबईतील विविध ठिकाणांहून बेकायदा १२५ ड्रोनचा साठा जप्त केला आहे. ड्रोनच्या वापरावर निर्बंध असतानाही नियम मोडून ड्रोन आयात केले जात असल्याच्या माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार केलेल्या कारवाईत १.४० कोटी रुपये किंमतीचे ड्रोन जप्त केले.

हेही वाचाः- 'नाईट लाईफ' हा फक्त चिरंजीवांचा हट्ट - नारायण राणे

 प्रजासत्ताक दिनी संभाव्य दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर मुंबईत ड्रोन कॅमेरे, दूरनियंत्रकांद्वारे वापरण्यात येणारी छोटी विमाने (रिमोट कंट्रोल लाईट एअर क्राफ्ट), पॅराग्लायडर्स यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी ही नियम पायदळी तुडवून ड्रोन उडवणाऱे आणि ड्रोनची बेकादा विक्री करणाऱ्यांवर सीमा शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. जास्त वजनांच्या ड्रोनच्या वापरावर निर्बंध असल्याने त्याची खरेदी-विक्री करता येत नाही. तरीही चीनमधून बेकायदा ड्रोनची आयात करणाऱ्या तीन कंपन्यांवर सीमा शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सुमारे १२५ ड्रोन जप्त केले आहेत. या ड्रोनच्या खरेदीसाठी रोख रक्कमेचा पर्याय होता, असेही सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचाः-हा बघा, २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब, मनसेचा जितेंद्र आव्हाडांना टोला

भारतीय हवाई उड्डाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भात कडक नियम लागू केले आहेत. त्यातच मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी असून कुठल्याही कार्यक्रमात ड्रोनचा वापर करण्यासाठी मुंबई पोलिसांची अधिकृत रित्या परवानगी घ्यावी लागते.  सीमाशुल्कने केलेल्या कारवाईत जप्त केलेले काही ड्रोन चार किमीपर्यंत उडण्याच्या क्षमतेचे आहेत. त्यामुळे विमानांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच काही ड्रोन सात किलोपर्यंतचे सामान वाहून नेण्याच्या क्षमतेचे असल्याचेही समोर आले आहे. या ड्रोनद्वारे ड्रग्ज, शस्त्रे, शस्त्रास्त्रांची ने-आण करण्याचा धोका असतो. त्यामुळे मोठ्या आकाराच्या ड्रोनच्या वापराची परवानगी केवळ संरक्षण दल, पोलिस आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी आहे. ताब्यात घेतलेल्या ड्रोनची किंमत १.४० कोटी रुपये असून भारतीय आणि विदेशी चलनदेखील मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आले आहे.

हेही वाचाः-मुंबईतील घरांच्या किंमती घटल्या, नाइट फ्रँकचा अहवाल


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा