Advertisement

हा बघा, २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब, मनसेचा जितेंद्र आव्हाडांना टोला

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या शिवथाळी उद्घाटनावरून मनसेनं टीका केली आहे.

हा बघा, २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब, मनसेचा जितेंद्र आव्हाडांना टोला
SHARES

महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना रविवारी मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेवर मनसेकडून सरकारवर गंभीर टीका करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या शिवथाळी उद्घाटनावरून मनसेनं टीका केली आहे.

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी या कार्यक्रमाचा फोटो ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे. '१० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस ! ' असं खोपकर यांनी ट्वीटमध्ये लिहलं आहे. शिवथाळी उद्धाटनावेळी जितेंद्र आव्हाड हे जेवत असताना त्या टेबलवर बिसलेरी पाण्याची बॉटल ठेवण्यात आली आहे. याच मुद्द्यावर बोट ठेवून मनसेनं आव्हाडांवर टीका केली आहे.

शिवभोजन योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना १० रुपयात जेवण उपलब्ध करून घ्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा अध्यादेशही आता काढण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याचं मुख्यालय असणाऱ्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे.

प्रत्येक केंद्रात रोज किमान ७५ आणि कमाल १५० जणांना शिवभोजन थाळी मिळणार आहे. दुपारी १२ ते २ यावेळेत शिवभोजन थाळी मिळणार आहे. त्यामुळे केवळ गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये सुसूत्रता असावी, यासाठी जेवणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांकदेखील नोंदवून घेण्यात येणार आहे. यासाठी महा अन्नपूर्णा या नावाचं अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर येथे लोकांना जेवता येणार आहे.



हेही वाचा

शिवभोजन योजनेसाठी ६.४८ कोटीचे अनुदान

अदनान सामी यांना पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा