Advertisement

मुंबईतील घरांच्या किंमती घटल्या, नाइट फ्रँकचा अहवाल

ग्राहकांनी घरखरेदी करण्याकडे पाठ फिरवल्याने मुंबईतील विकासकांना नाईलाजाने घरांच्या किंमती कमी कराव्या लागल्या आहेत. यामुळे मुंबईतील घरांच्या किमती कमी झाल्याची माहिती नाइट फ्रँक या आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार कंपनीने दिली आहे.

मुंबईतील घरांच्या किंमती घटल्या, नाइट फ्रँकचा अहवाल
SHARES

ग्राहकांनी घरखरेदी करण्याकडे पाठ फिरवल्याने मुंबईतील विकासकांना नाईलाजाने घरांच्या किंमती कमी कराव्या लागल्या आहेत. यामुळे मुंबईतील घरांच्या किमती कमी झाल्याची माहिती नाइट फ्रँक या आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार कंपनीने दिली आहे. नाइट फ्रँकने त्यांचा ग्‍लोबल रेसिडेन्शियल सिटीज इंडेक्‍स क्‍यू३ २०१९ हा अहवाल नुकताच सादर केला आहे. त्यात जगभरातील महत्त्वांच्या शहरांतील मालमत्तांची माहिती देण्यात आली आहे.  

निवासी घरांच्‍या किंमतीमध्‍ये वाढ होण्‍याच्‍या बाबतीत हैदराबाद हे शहर १५० शहरांच्या यादीत ९ टक्के वाढीसह १४ व्या स्थानावर राहिले आहे.  अव्‍वल २० शहरांमध्‍ये समाविष्‍ट असलेले हैदराबाद हे एकमेव भारतीय शहर आहे.  

हेही वाचा- धारावी पुनर्विकास : म्हाडाकडून सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला पुन्हा मंजुरी

याबद्दल नाइट फ्रँक इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक शिशिर बैजल म्‍हणाले, ''गेल्‍या ४ वर्षांमध्‍ये भारताच्‍या अव्‍वल ८ शहरांमधील घराच्‍या किंमतींमधील वाढ किरकोळ महागाई वाढीपेक्षा कमी राहिली आहे आणि ही तफावत २०१६च्‍या पहिल्‍या सहामाहीपासून झपाट्याने वाढत गेली आहे. दरवाढ होण्‍याचा कल राखलेले हैदराबाद हे एकमेव शहर आहे आणि किरकोळ महागाई असताना देखील या शहरातील घरांच्‍या किंमतींमध्‍ये वाढ दिसण्‍यात आली आहे. शहरांमधील घरांच्‍या किंमतींमधील ही अंतिम-युजर अनुकूल माहिती योग्‍य दिशेने उचललेले एक पाऊल आहे आणि समकालीन गृहखरेदीदारांच्‍या गरजांशी संलग्‍न आहे.''

तर, घराच्‍या किंमतींमध्‍ये घट झालेल्‍या भारतीय शहरांपैकी कोलकाता शहर १३० व्‍या स्‍थानावर राहिले आहे. कोलकाता शहरात घरांच्या किंमतीत २ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. तर मुंबई शहरातील घरांच्या किंमती ३ टक्‍क्‍यांची घटल्याने हे शहर या यादीत १३५ व्‍या क्रमांकावर राहिले आणि चेन्‍नई शहर ३ टक्‍क्‍यांची घट होत १३६ व्‍या स्‍थानावर राहिले. पुणे हे सर्वात कमी क्रमांक असलेले भारतीय शहर ठरले. हे शहर घराच्‍या किंमतींमध्‍ये ३.५ टक्‍क्‍यांची घट होत १३८ व्‍या स्‍थानावर राहिले.  

ग्‍लोबल रेसिडेन्शियल सिटीज इंडेक्‍स अधिकृत आकडेवारीचा उपयोग करत जगभरातील १५० शहरांमधील मुख्‍य निवासी किंमतींच्‍या व्‍यवहारावर देखरेख ठेवते. हंगेरीमधील बुडापेस्‍ट हे २४ टक्‍क्‍यांच्‍या सर्वोच्‍च वार्षिक दरवाढीसह ग्‍लोबल रेसिडेन्शियल सिटीज इंडेक्‍स क्‍यू३ २०१९मध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे. त्‍यानंतर चीनमधील शीन आणि चीनमधील वुहान येथील दरवाढ अनुक्रमे १५.९ टक्‍के आणि १४.९ टक्‍के आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा