Advertisement

धारावी पुनर्विकास : म्हाडाकडून सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला पुन्हा मंजुरी

सेक्टर ५ चा पुनर्विकास म्हाडा (mhada) च्या माध्यमातून होत आहे.या इमारतीचं बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे. यामधून म्हाडाला ६७२ घरे (home) मिळणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण (Madhu Chavan) यांनी दिली.

धारावी पुनर्विकास : म्हाडाकडून सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला पुन्हा मंजुरी
SHARES

धारावी (dharavi) चा पुनर्विकास (Redevelopment) करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारने आखला आहे. त्यासाठी धारावीचे ५  सेक्टर (विभाग) केले आहेत. त्यातील पहिल्या चार सेक्टरचा पुनर्विकास जागतिक पातळीवर निविदा (Tender) मागवून करण्यात येत आहे. सेक्टर ५ चा पुनर्विकास म्हाडा (mhada) च्या माध्यमातून होत आहे. सेक्टर ५ मधील म्हाडाकडून सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला पुन्हा शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या इमारतीचं बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे. यामधून म्हाडाला ६७२ घरे (home) मिळणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण (Madhu Chavan) यांनी दिली.

धारावी (dharavi) च्या पुनर्विकासासाठी  (Redevelopment)  राज्य सरकारने २००४ मध्ये धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची (डीआरपी) (Dharavi Redevelopment Authority) स्थापना केली. डीआरपीने सेक्टर ५ चे काम म्हाडाकडे २१ मे २०११ रोजी सोपवले. म्हाडाने ३०० चौरस फूट चटई क्षेत्र असलेल्या ३५८ सदनिकांचे काम पूर्ण करून त्याचे वितरण रहिवाशांना केले आहेत. म्हाडा (mhada) कडून सध्या ३५० चौरस फूट चटई क्षेत्राच्या ६८२ सदनिका असलेल्या क्रमांक ४ आणि ५ या इमारतींच्या १४ मजल्यांपर्यंतचे काम झाले आहे. आणखी ६७२ सदनिका असलेल्या इमारत क्रमांक २ आणि ३ ला आॅक्टोबर २०१७ मध्ये सीसी मिळाली. त्यानंतर डीआरपीने संपूर्ण धारावीचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा जीआर नोव्हेंबर २०१८ मध्ये काढला. यामुळे म्हाडाचे नुकसान होणार होते. त्यामुळे म्हाडामार्फत सुरू असलेल्या इमारतींची कामे पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यासाठी डीआरपीला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्याच वेळी मधू चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

या पत्राची दखल घेत महाआघाडी सरकारने म्हाडा (mhada) च्या ठप्प असलेल्या कामांना पुन्हा सुरुवात करण्यास मंजुरी दिली आहे. येत्या दीड वर्षामध्ये म्हाडाला ६७२ घरे मिळणार आहेत. सेक्टर पाच (sector 5) मध्ये सुमारे दहा हजार रहिवासी आहेत. या रहिवाशांचे पुनर्वसन (Rehabilitation) करण्यासाठी २२ मजल्यांचे टॉवर बांधण्यात येणार आहेत. धारावी (dharavi) त मोठ्या प्रमाणावर चर्मोद्योग आहे. तसेच फरसाण व इतर उद्योगही आहेत. पुनर्विकासानंतर कोणत्याही उद्योगाला अन्यत्र स्थलांतरीत केले जाणार नाही. चर्मोद्योग (Leather industry) व्यवसायही याच भागात ठेवला जाईल. त्यासाठी तळमजला अधिक एक मजला असे संकुल बांधण्यात येणार आहे.  पुनर्विकास (Redevelopment) करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारने आखला आहे. त्यासाठी धारावीचे ५  सेक्टर (विभाग) केले आहेत. 


  •  पुनर्विकासासाठी धारावीचे ५  सेक्टर (विभाग) केले आहेत. 
  • पहिल्या चार सेक्टरचा पुनर्विकास जागतिक पातळीवर निविदा (Tender) मागवून करण्यात येत आहे. 



हेही वाचा -

भविष्यात सीएसएमटी ते शिर्डी मार्गावर धावणार तेजस एक्स्प्रेस

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा