भविष्यात सीएसएमटी ते शिर्डी मार्गावर धावणार तेजस एक्स्प्रेस

सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस (Tejas Express) मुंबई सेन्ट्रल ते अहमदाबाद (Mumbai Central to Ahmadabad) या मार्गानंतर आता सीएसएमटी ते शिर्डी व्हाया पुणे (Pune) मार्गावरही धावणार आहे.

SHARE

सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस (Tejas Express) मुंबई सेन्ट्रल ते अहमदाबाद (Mumbai Central to Ahmadabad) या मार्गानंतर आता सीएसएमटी ते शिर्डी व्हाया पुणे (Pune) मार्गावरही धावणार आहे. दिल्ली ते लखनौ (Delhi to lucknow) , मुंबई ते अहमदाबाद मार्गावर आयआरसीटीसीनं (IRCTC) १८ जानेवारीला तेजस एक्स्प्रेस सुरू केली आहे. या एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ७३५ प्रवासी क्षमता असलेली ही गाडी गेल्या २ दिवसात हाऊसफुल्ल होत आहे. मात्र, ही तेजस एक्सप्रेस लवकरच शिर्डीपर्यंत (Shirdi) चालविण्यात येणार आहे.

सीएसएमटी ते शिर्डी व्हाया पुणे मार्गावर एप्रिल किंवा मे २०२० पासून शिर्डीसाठी तेजस एक्स्प्रेस चालवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती ‘इंडियन रेल्वे कॅटिरग अ‍ॅण्ड टूरिझम कॉपरेरेशन’कडून (आयआरसीटीसी) देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव (Proposal) सध्या रेल्वे बोर्डाकडे (Railway Board) आहे.

रेल्वे प्रवाशांनी केलेल्या सूचनांनुसार खाद्यपदार्थाचा दर्जा (Food quality) सुधारण्याबरोबरच अन्य काही बदल सुरू करण्यात आल्याची माहिती मिळते. प्रवाशांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता तेजस एक्स्प्रेसमध्ये मसाज खुर्ची (Massage Chair), मिनी चित्रपटगृहाची (Mini Theater) सुविधाही उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिनी चित्रपटगृहासाठी एक स्वतंत्र डबाच बसवण्यात येणार असल्याचं समजतं. भविष्यामध्ये याच सुविधा शिर्डी तेजसमध्येही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

तेजस एक्स्प्रेसच्या शेवटच्या आसनांमध्ये काही बदल करून तेथे यांत्रिक मसाज खुर्ची बसवण्यात येणार आहे. यामध्ये हात, पायांचा मसाज होणार आहे. यासाठी साधारणपणे ५० ते १०० रुपये शुल्क आकारण्याचा आयआरसीटीसीचा (IRCTC) विचार आहे. याशिवाय ६ तासांच्या प्रवासात विरंगुळ्यासाठी मिनी चित्रपटगृह उभारण्याची कल्पना आहे. यासाठी १० डब्यांच्या तेजसला (Tejas Express) आणखी एक डबा जोडला जाणार आहे. हा संपूर्ण डबा मिनी चित्रपटगृह (Mini Theater) म्हणून ओळखला जाणार आहे.

सीएसएमटी ते शिर्डी व्हाया पुणे अशी आणखी एक तेजस एक्स्प्रेस एप्रिल किंवा मे २०२० पर्यंत चालवण्याचा प्रयत्न असून, ही एक्स्प्रेस प्रतितास १३० किमी वेगाने धावणार आहे. तसंच, सीएसएमटीहून पुण्याला जाणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसच्या आधी शिर्डीसाठी तेजस एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे असून लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.हेही वाचा -

राज्याभरात मुंबई सर्वाधिक प्रदूषित शहर

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वाजणार 'वॉटर बेल'संबंधित विषय
ताज्या बातम्या