शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वाजणार 'वॉटर बेल'

विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना आता घंटा (Bell) वाजजून पाणी पिण्याची आठवण करून दिली जाणार आहे.

SHARE

आपलं शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी शरीरात पाण्याचं (Water) प्रमाण जास्त असणं गरजेचं असतं. अनेकदा डॉक्टरही (Doctor) याबाबत सल्ला देतात. परंतु, शाळेत (School) जाणारे अनेक विद्यार्थी (Students) वेळेत व शरीराला पुरेस पाणी पीयत नाहीत. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या बाटल्या (Water Bottle) घरी जातानाही भरलेल्या असतात. अशा विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना आता घंटा (Bell) वाजजून पाणी पिण्याची आठवण करून दिली जाणार आहे.

शालेय विद्यार्थी (School Students) पुरेसे पाणी पीत नसल्यामुळे त्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेत आता तीन वेळा घंटा (वॉटर बेल) वाजविण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागानं (School Education Department) मंगळवारी परिपत्रक काढलं आहे.

हेही वाचा - एचडीआयएलवर आणखी एक गुन्हा दाखल 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

दिवसभरात ठरावीक वेळेच्या अंतराने आवश्यक प्रमाणात पाणी पिणं हे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. मुलांच्या वजन, उंची, वयानुसार त्यांनी रोज दीड ते २ लीटर पाणी पिणं गरजेचं आहे. मुलांचा दिवसातील ५ ते ७ तासांचा कालावधी शाळेत जातो. या कालावधीत शरीराला पाण्याची (Water) अनेकदा गरज असते. मात्र, अभ्यास, खेळ यामुळं विद्यार्थी पाणी पीत नाहीत. त्याशिवाय, अनेक विद्यार्थी सकाळी घरातून नेलेलं पाणी पुन्हा घरी घेऊन येतात. आपली मुलं शाळेत पाणी पीत नसल्याच्या अनेक तक्रारी (Complaints) पालक नेहमी करत असल्याचं अनेक सर्वेक्षणातूनही समोर आलं आहे.

हेही वाचा - देशात सध्या फक्त ‘मोदी लिपी’, राज ठाकरेंचा मिश्कील टोमणा

विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत शरीराला आवश्यक तेवढं पाणी प्यावं आणि त्यासाठी त्याची आठवण व्हावी यासाठी ३ वेळा पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी पाण्याची घंटा (वॉटर बेल) वाजविण्यात येणार आहे. केरळमधील एका शाळेत सगळ्यात आधी वॉटर बेल (Water Bell) उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. याच धर्तीवर आता असोसिएशन आॅफ प्रायमरी एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेनं सुद्धा पुणे, दिल्ली, बंगळुरू येथील शाळांमध्ये हा उपक्रम राबविला.

जिल्हा परिषदेच्या शाळेच्या धर्तीवर एका सत्रात किमान ३ वेळा घंटा वाजवण्यात यावी, असा आग्रह शिवसेनेनं धरला होता. त्यानुसार, यासंदर्भात ठरावही महापालिका सभागृहात मांडण्यात आला होता. शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ही मागणी केली होती.हेही वाचा -

अश्वीनी भिडेंची उचलबांगडी, आरे कारशेड प्रकरण भोवलं

२ वर्षांत उभं राहू शकेल आंबेडकर स्मारक, शरद पवार यांचा विश्वाससंबंधित विषय
ताज्या बातम्या